CM Eknath Shinde Undergoes Minor Eye Surgery in Thane Saam Tv
मुंबई/पुणे

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा विश्रांतीचा सल्ला

CM Eknath Shinde Minor Eye Surgery: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर ठाणे येथे किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली.

Satish Kengar

CM Eknath Shinde Undergoes Minor Eye Surgery in Thane:

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यांवर ठाणे येथे किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आली. शुक्रवारी सकाळी ठाण्यातील प्रख्यात नेत्रतज्ञांनी मोतीबिंदू आणि चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर शस्त्रक्रिया केली. ही लेझर शस्त्रक्रिया असल्याने डॉक्टरांनी त्यांना एक दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

सततचे दौरे आणि दिवसभरातील व्यस्त वेळापत्रकामुळे मुख्यमंत्री सतत राज्यभर दौऱ्यावर असतात. नुकतेच ते शिवसेनेचे खानापूरचे आमदार अनिल बाबर यांच्या अंत्यदर्शनासाठी विट्याला गेले होते. त्यानंतर शुक्रवारी ते ठाण्यात आले. येथे मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यावर लेझरने शस्त्रक्रिया करण्यात आली.

डॉक्टरांनी मुख्यमंत्र्यांना एक दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी असून, तेथून ते काम सुरू ठेवणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress Death: सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला, ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड; मनोरंजन विश्वावर शोककळा

Health Tips : दातांमध्ये गॅपमुळे मनमोकळे हसता येईना! हसताना लाज वाटतेय? या उपाय खुलवतील तुमचं हास्य

चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा पर्दाफाश; सेविकेवर कारवाई, आता प्रशासनाने घेतला मोठा निर्णय!

पाण्याचा प्रश्न सुटणार? 140 एकरांसाठी ब्रिजस्टोन इंडियाची मोठी घोषणा! नेमका काय आहे प्रोजेक्ट?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची भाजपविरोधात आक्रमक भूमिका

SCROLL FOR NEXT