Ladki Bahin Yojana Saam Tv
मुंबई/पुणे

Ladki Bahin Yojana: निकषाबाहेर असतील त्यांचाही पुनर्विचार करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

CM Devendra Fadnavis on Ladki Bahin Yojna: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली मात्र त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत लाडकी बहिण योजनेबाबत फडणवीस काय म्हणाले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू करण्यात आली आहे. राज्यातील गरीब महिलांना या योजनेच्या माध्यमातून दरमहा आर्थिक मदत केली जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या योजनेवर अनेक चर्चा सुरु आहेत, मात्र सध्या सत्ता स्थापनेनंतर लाडकी बहिण योजनेबद्दल महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मार्फत बहिणींना २१० रुपये देणार असल्याचे वक्तव्य केले.

काल मुंबईत माननिय देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १२ दिवसांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री(minister) म्हणून शपथ घेतली आहे. निवडणुकीच्या दरम्यान राज्याक पुन्हा सत्ता महायुती सत्ता स्थापन झाल्यानंतर लाडकी बहिण(Ladki Bahin Yojana) योजनेत महिलांना १५०० रुपयांऐवजी २१०० रुपये देऊ असे आश्वासन दिले होते.

काल झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना २१०० रुपये देण्याचे सांगितले शिवाय ते म्हणाले की,'' बजेटच्या वेळेस लाडकी बहिण योजनेच्या रक्कमेबाबत विचार करु, बजेट ठरवताना आर्थिक स्त्रोत या बद्दल विचार करु''.

एवढेच नाही तर जी आश्वासने दिलेली आहेत ती सुद्धा पूर्ण करण्यात येतील आणि सर्व आश्वासने व्यवस्थितरित्या पूर्ण करण्यासाठी जी काही व्यवस्था करावी लागेल ती आधी पूर्ण करु. या व्यतिरिक्त या सर्व निकषाच्या बाहेर कोणी भेटला शिवाय काही तक्रारी आल्यातर त्याचाही संपूर्ण विचार करु, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

लाडकी बहिण योजना अजून पारदर्श व्हावी यासाठी या योजनेसाठी पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या आलेल्या अर्जाची फेरतपासणी केली जाणारा आहे. त्यात फक्त गरजू महिलांना अर्थसहाय्य मिळावे यासाठी योग्य पडताळणी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT