Maharashtra Cabinet Expansion Latest News Saam TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion: शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्याच? भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली

Maharashtra Cabinet Expansion Latest News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजेच रविवारी होण्याची शक्यता आहे.

साम टिव्ही ब्युरो

Maharashtra Cabinet Expansion Latest News: राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार उद्या म्हणजेच रविवारी होण्याची शक्यता आहे. कारण, सोमवारी (१९ जून) शिवसेनेचा वर्धापन दिन आहे, त्या अगोदरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.

गेल्या अनेक दिवसांपासून सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) रडखडलेला आहे. सरकारच्या नव्या मंत्रिमंडळ विस्तारात नेमकं कोणकोणत्या आमदारांना संधी दिली जाईल, याचीच उत्सुकता अनेकांना लागली आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळात कुणाला स्थान मिळणार? याबाबत भाजप आणि शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली आहे.

दरम्यान, आज संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची (Amit Shah) भेट घेणार आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबात चर्चा होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी सायंकाळी छोटेखानी मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा होणार असा अंदाज बांधला जात आहे.

नव्या मंत्रिमंडळ विस्तारात भाजप आणि शिवसेनेकडून कोणाकोणाला संधी द्यायची आणि सध्या असलेल्या पैकी कोणाला वगळायचे याबाबत आज चर्चा होऊन निर्णय होऊ शकतो, असा अंदाज बांधला जात आहे. त्यामुळे आता आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चित्र स्पष्ट होईल अशी शक्यता आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

शिवसेनेच्या (Shivsena) वर्धापनदिनाआधी हा मंत्रिमंडळ विस्तार करायला हवा, असं मत मुख्यमंत्री शिंदेंनी या बैठकीत व्यक्त केलं होतं. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शिवसेनेच्या वर्धापणदिनाआधी होणार की पुन्हा लांबणीवर पडणार? हेच पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हालचाली सुरू होताच भावी मंत्र्यांची धाकधूक वाढली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LPG New Rule: मोठी बातमी! केंद्र सरकारकडून LPG च्या नियमात मोठा बदल, 'या' नागरिकांना मिळणार नाही गॅस सिलिंडर

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्गाचा पुन्हा आराखडा बदलला, लांबी वाढली; शेतकऱ्यांचा विरोध शमला

Maharashtra News Live Update: शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

Paneer and Moong Chilla Recipe: प्रोटीनने भरपूर हेल्दी आणि टेस्टी नाश्त्यासाठी झटपट बनवा पनीर-मूग चीला

Mirchi Pakora Recipe : स्ट्रीट स्टाइल कुरकुरीत मिरचीचे भजी कसं बनवाल? वाचा ५ मिनिटांत होणारी रेसिपी

SCROLL FOR NEXT