Ajit Pawar and Eknath Shinde Devendra Fadnavis Latest news in Marathi SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet expansion 2023 : महायुतीचं ठरलं! पुढील २४ तासात कळणार कुणाला कोणतं मंत्रिपद मिळणार?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रुपाली बडवे

Mumbai News : राज्यात काही दिवसांपूर्वी राजकीय भूकंप झाला. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत काही आमदारांना घेऊन राष्ट्रवादीत फूट पाडली. अजित पवारांच्या नेतृत्त्वात बंडखोर आमदारांनी शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला.

२ जुलै रोजी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीच्या ८ आमदारांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र १० दिवस उलटून राष्ट्रवादीचे मंत्री खात्यांविना आहेत. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कोणतं मंत्रिपद मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे. (Latest Marathi News)

खातेवाटप आणि मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रोज नवीन अपडेट समोर येत आहे. खातेवाटपासोबत भाजप-शिवसेनेचे आमदारही मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र मात्र विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील २४ तासात अजित पवार गटाला खातेवाटप केलं जाईल. (Maharashtra Politics)

राष्ट्रवादी अर्थ खात्यासाठी इच्छुक असल्याची माहिती माहिती आहे. मात्र वित्त खात्याबाबत अजून चर्चा सुरू आहे. त्यावर तोडगा काढला जाईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आता मंत्रिमंडळ विस्तार लपून छपून करण्याची गरज नाही. विस्तार करण्यापूर्वी सगळ्यांना माहिती देऊ, सरकार मजबूत आहे, असंही युतीतील नेत्यांकडून सांगितलं जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Satyendar Jain Bail: सत्येंद्र जैन 873 दिवसांनी तुरुंगाबाहेर, आप नेत्याचा जामीन मंजूर; कोणत्या प्रकरणात झाली होती अटक? वाचा...

Health Tips: बदामाची पावडर दुधात टाका अन् मिळतील आरोग्यदायी फायदे

Maharashtra News Live Updates: आमदार भारती लवेकर समर्थनार्थ कार्यकर्त्यांची सोशल माध्यमातून पोस्टरबाजी

VIDEO : स्वार्थासाठी झालेल्या 'आघाडी' बिघाडी होणारच; एकनाथ शिंदेची मविआतील वादावर टीका !

Tasgaon Vidhan Sabha : तासगावमध्ये होणार घड्याळ- तुतारीत काट्याची लढत; भाजपचे नेते घड्याळ घेऊन उतरणार मैदानात

SCROLL FOR NEXT