Devendra Fadnavis And Eknath Shinde Maharashtra Politics Update SAAM TV
मुंबई/पुणे

Maharashtra Cabinet Expansion 2022 : शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, पाहा कोणी घेतली शपथ

पहिल्या टप्प्यात एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : शिंदे सरकारच्या (Eknath Shinde) मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर मुहुर्त मिळाला. तब्बल 39 दिवसांनंतर सरकारला मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त मिळाला. पहिल्या टप्प्यात आज भाजप आणि शिंदे गटातील मिळून एकूण 18 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पहिली शपथ घेतली. त्यांच्यानंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शपथ घेतली. तिसरा क्रमांक हा चंद्रकांत पाटील यांचा लागला आहे. पाटील यांनीही ईश्वराला साक्षी ठेवून शपथ घेतली. (Maharashtra Cabinet Expansion LIVE Updates)

दरम्यान, शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यातून अनेक आमदारांना डावलण्यात आलं. त्यामुळे मंत्रिपदाची आस धरून बसलेले अनेक भाजप आमदार तसेच शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची माहिती आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह्याद्री अतिथीगृहावरील आमदारांसोबतच्या बैठकीत या नाराजीचा उद्रेक झाल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार संजय शिरसाट हे मंत्रिपदाची संधी हुकल्यामुळे प्रचंड नाराज झाल्याचे समजते. गेल्या काही दिवसांत संजय शिरसाट हे शिवसेना, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर आक्रमकपणे हल्ला चढवताना दिसत होते. त्यामुळे संजय शिरसाट यांचे मंत्रिमंडळातील स्थान पक्के मानले जात होते. परंतु, आता मंत्रिमंडळातून त्यांचा पत्ता कट झाल्याचे समजते.

शिंदे गटाकडून कुणी घेतली शपथ

तानाजी सावंत

उदय सामंत

संदीपान भुमरे

दादा भुसे

अब्दुल सत्तार

दीपक केसरकर

शंभूराज देसाई

संजय राठोड

गुलाबराव पाटील

शिंदे गटाकडून पहिल्या टप्प्यात ९ आमदारांना यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. याशिवाय भाजपकडून सुद्धा पहिल्या टप्प्यात ९ आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे.

भाजपकडून कुणी घेतली मंत्रिपदाची शपथ

गिरीश महाजन

चंद्रकांत पाटील

सुधीर मुनगंटीवार

सुरेश खाडे

राधाकृष्ण विखे पाटील

अतुल सावे

रवींद्र चव्हाण

विजयकुमार गावित

मंगलप्रभात लोढा

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT