Maharashtra auto taxi meter scam saam tv
मुंबई/पुणे

राज्यात रिक्षा-टॅक्सींचा मीटर घोटाळा, इलेक्ट्रॉनिक चिपच्या मदतीनं प्रवाशांची लूट

Maharashtra Auto-Taxi Meter Fraud Busted: चालकांनी प्रवाशांच्या पैशांवर डल्ला मारण्यासाठी रिक्षा- टॅक्सीच्या मीटरशी छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय,...मात्र पोलिसांनी मीटर घोटाळ्याचा पर्दाफाश कसा केला...पाहूयात या रिपोर्टमधून...

Suprim Maskar

तुम्ही टॅक्सी, रिक्षाने प्रवास करत असाल तर सावध व्हा...कारण, तुमची फसवणूक होऊ शकते...राज्यात आता टॅक्सी आणि रिक्षा मीटरचा घोटाळा होत असल्याचं समोर आलंय...मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक रनिंग सर्किट बसवून कृत्रिम भाडेवाढ करून प्रवाशांची लूट केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय...दहिसरमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय...टॅक्सी-रिक्षा मीटरमध्ये नेमका कसा घोटाळा करण्यात येतोय...पाहूयात...

राज्यात टॅक्सी-रिक्षा मीटर घोटाळा

मीटरमध्ये इलेक्ट्रॉनिक LED सर्किटचा वापर

मीटरच्या सेन्सर वायरला पल्स जनरेटरची जोडणी

मीटरमध्ये लाल डॉट वेगानं चमकू लागतो

वाहन थांबलं असल्यावरही मीटर वेगानं धावतं

सर्किटमुळे अंतर आणि भाडं झपाट्यानं वाढतं

दरम्यान मीटरमधील घोळ फक्त दहिसरमध्येच नाही, तर मुंबईत अनेक ठिकाणी होत असल्य़ाचा आरोप मनसेनं केलाय...दरम्यान मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या 3 टॅक्सी आणि 2 रिक्षाचालकांवर पोलिसांनी कारवाई केलीय... तसचं मीटरमध्ये कशी फेरफार केली जाते याचा डेमोच पोलीस अधिकाऱ्यांनी दाखवालय.

मीटरसोबत छेडछाड करून कृत्रिम भाडेवाढ दाखवणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांमुळे सर्वसामान्यांची सर्रास लूट सुरू आहे. दहा वर्षांपूर्वी असाच मीटर घोटाळा समोर आला होता. आता पुन्हा या घोटाळेबाजांनी प्रवाशांना लुटण्यासाठी नवी शक्कल शोधलीय. मात्र हे लुटीचं जाळं सगळ्य़ाच शहारांमध्ये पसरलंय का? याची सखोल चौकशी करून पाळमूळं शोधण्याची गरज आहे. अन्यथा दररोज लाखो प्रवाशांची लूट होतच राहणार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP च्या आंदोलनानंतर काही तासांतच स्वतंत्र भारद्वाजला पकडले; त्या दिवशी काय घडलं होतं?

Crime: काँग्रेस नेत्याच्या घरावर गोळीबार, ७ जणांना बेड्या; विश्वास नांगरे पाटलांची कारवाई, ४६ गुन्हे दाखल असलेला निघाला मास्टरमाईंड

मंत्र्यांच्या भेटीनंतरही जरांगे आंदोलनावर ठाम, जरांगेंविरोधात भुजबळांचीही आक्रमक भूमिका

DJ वाजवाल तर जेलमध्ये जाल! गणेश मंडळांवर पोलिसांची करडी नजर

बापटांवर हल्ला, एकवटले पुणेकर, विचारवंत पुणेकर काढणार मोर्चा

SCROLL FOR NEXT