Suspicious Boat Found in Raigad Saam TV
मुंबई/पुणे

Suspicious Boat : रायगड संशयित बोट प्रकरणी महाराष्ट्र एटीएसकडून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

सुरज सावंत

मुंबई: रायगड जिल्ह्याच्या हरिहरेश्वरच्या समुद्र किनाऱ्यावर (Harihareshwar Beach) १८ ऑगस्टला सकाळी संशयीत बोट (Boat) आढळून आली होती. यात शस्त्रसाठा सापडल्यामुळे राज्यभरात या बोटीबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. बोटमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडसूतामुळे या बोटद्वारे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आता महाराष्ट्र एटीएसने (ATS) अज्ञात व्यक्तीविरुद्ध शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. (Raigad Latest News)

हे देखील पाहा -

रायगडमध्ये एक बोट सापडली होती, ज्यामध्ये 3 AK-47 व 247 जिवंत काडतुसे सापडली होती. एटीएसने अधिकृतरित्या या बोटीशी संबंधित लोकांची संपूर्ण माहिती मागवली आहे. बोटीशी संबंधित कंपनीकडे जी काही माहिती असेल, त्या कागदपत्रांची भारतीय एजन्सीकडून मागणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. समुद्र किनाऱ्यावर आढळलेल्या या संशयीत बोटमध्ये 3 Ak 47 रायफली, 225 जिवंत काडतुसांसह आणि 10 संशयीत बॉक्स सापडले होते. बोटमध्ये सापडलेल्या रायफल आणि काडसूतामुळे या बोटद्वारे राज्यात काही घातपात करण्याचा कोणाचा डाव होता का? असा संशय व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dharangaon News : पोहण्यासाठी विहिरीत उडी मारली पण बाहेर आलाच नाही; तरुणाचा बुडून मृत्यू

PM Modi Speech: 'काँग्रेसने एससी, एसटी ओबीसींना जाणूनबुजून मागे ठेवलं', PM मोदींचा मोठा आरोप; मविआवरही जोरदार टीकास्त्र| पाहा VIDEO

IAS, IPS अधिकाऱ्यांचा पगार किती? कोण घेतं सर्वाधिक मानधन? जाणून घ्या

Maharashtra News Live Updates: देशातील सर्वात भ्रष्ट परिवार म्हणजे काँग्रेसमधील शाही परिवार - मोदी

MHADA Lottery 2024: घरं 2030, अर्ज तब्बल 134344; किंमती कमी झाल्यानंतर लोकांचा कल वाढला!

SCROLL FOR NEXT