Satyajeet Tambe Saam TV
मुंबई/पुणे

Satyajeet Tambe on Student : 'महाज्योती'ने एमएचटी-सीईटी, जेईई व नीटच्या प्रशिक्षणार्थीची संख्या कमी केली, आ. सत्यजीत तांबे यांनी वेधले सरकारचे लक्ष

Political news : इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही संख्या ६५०० केल्याचे मान्य केले.

प्रविण वाकचौरे

Mumbai News : 'महाज्योती' ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून या संस्थेतर्फे गोरगरिब व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी तसेच इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षण दिले जाते.

महाज्योतीतर्फे देण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षांच्या प्रशिक्षणार्थीची संख्या गेल्या वर्षी १५ हजारांवरून ६५०० पर्यंत का कमी करण्यात आली आहे, असा प्रश्न आमदार सत्यजीत तांबे यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला होता.

यावर इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी ही संख्या ६५०० केल्याचे मान्य केले. मंत्री सावे यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की, महाज्योती संस्थेत सन २०२२-२३ मध्ये MHT-CET/JEE / NEET या प्रशिक्षणाकरिता विद्यार्थ्यांचे एकूण ४९६२ अर्ज प्राप्त झालेले होते. त्यापैकी ४२११ विद्यार्थी प्रशिक्षणासाठी पात्र होते. (Maharashtra News)

सन २०२२-२३ मध्ये प्रत्यक्ष लाभ घेतलेल्या विद्यार्थ्याची संख्या लक्षात घेऊन सन २०२३-२४ करिता विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ करुन ६५०० करण्यात आली आहे. (Political News)

एमएचटी-सीईटी, जेईई व नीट या परीक्षांच्या प्रशिक्षणार्थीची संख्या गेल्या वर्षी १५ हजारांवरून ६५०० पर्यंत कमी करण्यात आली असल्याने राज्यातील इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील हुशार विद्यार्थ्यांना प्रशिक्षणापासून वंचित रहावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! ८-९ जुलैला राज्यातील कोणतीही शाळा बंद नाही, शिक्षण विभागाने काढले आदेश

IND vs ENG : भारताचं खातं उघडलं, इंग्लंडचं गर्वहरण, मालिकेत बरोबरी; शुभमन गिलच्या यंग ब्रिगेडनं करुन दाखवलं

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

SCROLL FOR NEXT