Anand Nirgude Saam TV
मुंबई/पुणे

Pune News : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा; आयोगच बरखास्त होणार?

Magasvarg Ayog : महाराष्ट्र राज्य मागसवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News :

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगातील राजीनामा सत्र सुरुच आहे. आधीच चार सदस्यांनी राजीनामा दिला असताना आता महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे (निवृत्त) यांनी मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिल्याने मागासवर्ग आयोग बरखास्त होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आनंद निरगुडे यांनी शासकीय हस्तक्षेपामुळे त्रस्त होऊन राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. निरगुडे यांचा राजीनामा मुख्य सचिव यांनी स्वीकृत केला आहे. त्या अनुषंगाने OBC मंत्रालयातील अवर सचिव नरेंद्र आहेर यांनी पत्रकान्वये राज्य मागासवर्ग आयोगाच्या कार्यालयास कळवले आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

याआधी बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, लक्ष्मण हाके, बी एल किल्लारीकर यांनी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. (Latest News Update)

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. एकीकडे ही डेडलाईन तोंडावर आली आहे. तर दुसरीकडे राज्य मागासवर्ग आयोगात मात्र सदस्यांचे राजीनामा सत्र सुरू आहे.

राज्य सरकार आणि आयोगाचे सदस्य यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयात आयोगाच मराठा समाजाचं मागासलेपण सिद्ध करणार आहे त्यामुळे हा वाद राज्यासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.

आयोगाच्या सदस्यांवरती सरकार दबाव टाकत आहे . आयोगाला कामकाजासाठी अजेंडा ठरवून दिला जातोय असा थेट आरोप आयोगाचे राजीनामा दिलेले सदस्य करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stray Animal Attack : मुलासाठी आई बनली ढाल! मोकाट जनावराने मुलाला पायदळी तुडवलं, पण मातेनं वाचवले प्राण, घटना CCTVत कैद

Cancer Risk: कारण नसताना पाठ, छाती किंवा डोकं दुखतंय? असू शकतो कॅन्सरचा धोका, वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Gold Rate Today: दसऱ्याच्या आदल्या दिवशी सोनं ₹१२०० रुपयांनी महागलं, वाचा २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर

Kalyan : कल्याण डोंबिवलीत वाहतूक कोंडीचा विळखा; नो-एंट्री आदेशानंतरही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Maharashtra Live News Update: रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही

SCROLL FOR NEXT