Lumpy Skin Disease रुपेश पाटील
मुंबई/पुणे

Lumpy Skin Disease: राज्यात २६६४ पशुंना लम्पीचा संसर्ग; पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होणार

Lumpy Skin Disease News : पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लम्पी आजाराशी संबंधीत शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, पुणे

पुणे: राज्यात लम्पी चर्म रोगाचा (Lumpy Skin Disease) फैलाव वाढला आहे. जनावरांना होणाऱ्या या त्वचेच्या आजाराची लागण माणसालाही होते का? या आजाराचा संसर्ग माणसालाही होतो का? जनावरांची काय काळजी घ्यावी असे अनेक प्रश्न सध्या पशुपालकांना पडले आहेत. याबाबत शासनाकडून जागरुकता करण्यात येत आहे. आज, मंगळवारी पुण्यात (Pune) पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी लम्पी आजाराशी संबंधीत शासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांबद्दल माहिती दिली आहे. (Lumpy Skin Disease News)

पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, लंम्पी चर्म रोगाने आजपर्यंत २६६४ जनावरे संक्रमित झाले असून यातील १५२० जनावरे बरे झाले आहेत. जर पशु लम्पी आजाराने बाधित असेल तर, खबरदारीचा उपाय म्हणून त्या परिसरात ५ किलोमीटरमधील जनावरांचे लसीकरण गरजेचे आहे. राज्यात १६ लाखांहून अधिक लसी उपलब्ध आहेत, तर अतिरिक्त ५ लाख लसी प्राप्त होणार आहेत. पुढील आठवड्यात ५० लाख लसी उपलब्ध होतील अशीही माहिती त्यांनी दिली आहे.

लम्पी रोग माणसांनाही होतो का?

लम्पी रोग माणसांनाही होतो का? याबाबत विचारलं असता पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह म्हणाले की लम्पी चर्म रोग हा माणसांना होत नाही. तसेच प्राण्यांपासून मिळणाऱ्या दुधातूनही हा संक्रमित होत नाही. त्याचप्रमाणे म्हशीलाही हा रोग होत नाही, त्यामुळे त्यांना लसीकरण करण्याची गरज नाही. लम्पी आजार हा फक्त गाय आणि बैलाला होतो अशीही माहीती त्यांनी यावेळी दिली आहे. जनावरांमध्ये संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात बैल बाजार पुढील आदेशापर्यंत बंद राहील अशीही त्यांनी माहिती दिली आहे. तसेच शासनाने दिलेले सगळे आदेश पाळावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked raisins: 30 दिवस रोज सकाळी खा पाण्यात भिजवलेले मनुके; होणारे फायदे वाचून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

Maharashtra News Live Update: १८,६०० फूट उंचीवर भारतीय लष्कराच्या वैमानिकांचा थरारक पराक्रम; एकाच स्किडवर लँडिंग करत जखमीची केली सुटका

टिटवाळा स्थानकात १५ दिवसांचा मोठा मेगाब्लॉक! १५ दिवस लोकल गाड्यांचे वेळापत्रक कोलमडणार; अनेक गाड्या रद्द

Bank Holidays 2026: बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी! सप्टेंबरमध्ये 15 दिवस बँकांना सुट्ट्या, वाचा संपूर्ण यादी

Weekend Getaway : मुंबईकरांनो, पावसाळ्यात One Day Trip साठी हे ठिकाण आहे एकदम परफेक्ट!

SCROLL FOR NEXT