दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाला कात्री?; LPG सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार Saam Tv
मुंबई/पुणे

दिवाळीच्या तोंडावर सामान्यांच्या खिशाला कात्री?; LPG सिलेंडरचे दर पुन्हा भडकणार

पुढील आठवड्यात एलपीजी गॅस (LPG) सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

वृत्तसंस्था

पेट्रोल-डिझेल (Petrol-diesel) आणि सीएनजीच्या (CNG) किमतीत दररोज वाढ होत असताना, या महिन्यात सलग दुसऱ्यांदा गॅस सिलिंडरच्या (Gas cylinder) किमती वाढण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात एलपीजी गॅस (LPG) सिलिंडरच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एलपीजीच्या बाबतीत, कमी किंमतीच्या विक्रीतून होणारा तोटा प्रति सिलेंडर 100 रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे त्याच्या किमतीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. पण एलपीजी सिलिंडरची किंमत किती वाढणार, हे सरकारच्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. याआधी 6 ऑक्टोबर रोजी एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 15 रुपयांची वाढ करण्यात आली होती. जुलैपासून 14.2 किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत तब्बल 90 रुपयांनी वाढ झाली असल्याचे समोर आले आहे.

सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम विपणन कंपन्यांना किरकोळ किंमतीशी जुळवून घेण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. याशिवाय ही तफावत भरून काढण्यासाठी शासनाकडून आतापर्यंत कसलेही अनुदान देण्यात आलेले नाही. आंतरराष्ट्रीय किमतीत झालेल्या वाढीमुळे एलपीजीच्या विक्रीतील तोटा 100 रुपये प्रति सिलेंडरवर गेला आहे.

सौदी अरेबियामध्ये एलपीजी सिलेंडरच्या दरात या महिन्यात 60 टक्क्यांनी वाढ होवून 800 डॉलर प्रति टन झाली आहे, तर आंतरराष्ट्रीय बेंचमार्क ब्रेंट क्रूड 85.42 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला आहे. सध्या दिल्ली आणि मुंबईमध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत 899.50 रुपये आहे. तर कोलकात्यात तो 926 रुपये आहे. देशातील पात्र कुटुंबांना त्याच दरात अनुदानित एलपीजी सिलिंडर मिळतात. एका वर्षात, त्यांना अनुदानित दरात प्रत्येकी 14.2 किलोचे 12 सिलिंडर मिळतात.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

गाडीचं तिकीट मिळालं नाही? चिंता सोडा! कोकणात जाणाऱ्यांसाठी ३४ स्पेशल गाड्या; वेळापत्रक पाहाच

Vanilla Ice Cream: बाजारातील आईस्क्रीम विसरा, घरी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट व्हॅनिला आईस्क्रीम; वाचा रेसिपी

Pune : भीषण स्फोटाने खळबळ! पिंपरी-चिंचवड शहराचा वीजपुरवठा खंडित; पाहा नक्की काय घडलं

राजधानीत थरारक घटना! 5 मजली इमारत कोसळली; 50 हून अधिक विद्यार्थी ढिगाऱ्याखाली

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

SCROLL FOR NEXT