'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच प्रियकराने केली आत्महत्या... Saam Tv
मुंबई/पुणे

'तू मर जा' असे प्रेयसीने म्हणताच प्रियकराने केली आत्महत्या...

व्हिडिओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.

प्रदीप भणगे

डोंबिवली - ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ अस प्रेयसीने बोलताच एका तरुणाने भावनेच्या भरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणामध्ये Kalyan उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्ये Suicide पूर्वी या तरुणाने फेसबुक लाईव्ह Facebook Live करून आपण आत्महत्या करत असल्याचे सांगितले होते हा व्हिडिओ पाहून त्याच्या मित्रांनी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे.

हे देखील पहा -

या तरुणाचे नाव अंकुश पवार असे असून तो कल्याण पश्चिम बेतुरकर पाडा येथील साईकृपा इमारतीमध्ये राहत होता. मूळचा हा तरुण जालन्याचा असल्याची माहिती समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी नोकरीच्या शोधात हा तरुण कल्याण या ठिकाणी आला होता.

अंकुश एका खाजगी रुग्णालयात वॉर्ड बॉय म्हणून काम करत होता अशी माहिती समोर आली आहे. यादरम्यान त्याचे एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. मात्र काही कारणामुळे या दोघांमध्ये वाद झाले आणि याच रागातून प्रेयसीने त्याला ‘मला तुझी गरज नाही, ‘तू मर जा’ असे सुनावले. त्यामुळे दुःखी झालेल्या अंकुशने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केली.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Maharashtra News Live Update: पावसासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; वरुणराजाला साकडं घालत चक्क गाढवाचं लग्न!

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT