पुणेकरांची दिवाळी होणार गोड, म्हाडाची तीन हजार घरांची लॉटरी सागर आव्हाड
मुंबई/पुणे

पुणेकरांची दिवाळी होणार गोड, म्हाडाची तीन हजार घरांची लॉटरी

मात्र यंदा एकाच वर्षात तीन वेळा लॉटरी काढण्यात आली आहे.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : दिवाळीच्या मुहूर्तावर पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे. एका वर्षांत घरांच्या लाॅटरीची हॅटट्रिक करत म्हाडाच्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने पाटील Nitina Mane Patil यांनी आणखी एक विक्रम केला आहे. यापूर्वी दोन-तीन वर्षांतून एखादी लाॅटरी Lottery काढली जात होती. मात्र यंदा एकाच वर्षात तीन वेळा काढली लॉटरी काढण्यात आली आहे.

हे देखील पहा -

जानेवारीनंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह सांगली, सोलापूर, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अडीच हजार घरांची सोडत म्हाडाने काढली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा दिवाळीचा मुहूर्त साधत पुणे म्हाडाने आणखी तीन हजार पेक्षा अधिक घरांसाठी लाॅटरी काढत आहे. यामध्ये दीड हजार घरे वीस टक्क्यातील व सर्व नामांकित व मोठ्या बिल्डरांच्या Builder प्रकल्पातील असणार आहेत.

सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे खूपच बिघडली होती. या काळात आर्थिक दुर्बल घटकातील लोकांचे घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुणे म्हाडाने पुढाकार घेतला. ऐन कोरोना काळात म्हाडाच्या वतीने इतिहासातील सर्वात मोठी तब्बल ५ हजार ६५७ घरांची सोडत काढून मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर पुन्हा आता पुणे म्हाडाच्या वतीने तब्बल तीन हजाराहून अधिक घरांसाठी लाॅटरी काढण्यात येणार आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

युद्ध पुन्हा पेटणार? ट्रम्पची शरणागती अमान्य; इराणनं शस्त्रसंधी फेटाळून लावली

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला, पत्नीला विषारी औषध पाजल्याचा आरोप | Buldhana crime

Valsad Accident: लग्नाला जाताना काळाचा घाला, ३० जणांना घेऊन जाणारी व्हॅन उलटली, ६ जणांचा जागीच मृत्यू

Shaktipeeth Highway: शक्तीपीठ महामार्ग जाणार तिथे रातोरात फुलवल्या आंब्याचा बागा, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT