Lonavala Tourist Spot Saam Tv
मुंबई/पुणे

VIDEO: मोठी बातमी! लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी, पुणे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये

Lonavala Tourist Spot: लोणावळ्यातील भुशी डॅम परिसरातील धबधब्यावर ५ जण वाहून गेल्याच्या घटनेनंतर पुणे जिल्हाधिकारी अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. आता लोणावळ्यात संध्याकाळी ६ नंतर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

Priya More

लोणावळ्यातल्या भुशी डॅम (Bhushi Dam) परिसरातील धबधब्यावरून ५ पर्यटक वाहून गेल्याची घटना रविवारी घडली होती. या घटनेनंतर पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. अशामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) थेट कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी ६ वाजल्यानंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांवर कारवाई होणार आहे. कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील बडगा उगारला जाणार आहे, अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी दिली. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. भुशी डॅम परिसरातील धबधब्यात पुण्यावरून आलेल्या अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय ५ जण वाहून गेले होते. यामधील ४ जणांचा मृतदेह सापडला तर एकाचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bridal Beauty Kit: लग्नानंतर नव्या नवरीच्या बॅगेत असायलाच हव्यात 'या' ७ गोष्टी, कधीही ठरतील फायदेशीर

Maharashtra News Live Update: मुंबई-सावंतवाडी नव्या रेल्वेचे सावंतवाडीत जल्लोषात स्वागत

Cabinet Meeting: दिल्ली-मुंबई-कोलकाता-चेन्नई कनेक्टिव्हिटीला बूस्ट; 7 हाय-डेन्सिटी कॉरिडॉरचा होणार विस्तार, रेल्वे नेटवर्कमध्ये मोठा बदल!

Property Rights: नातवाला नाही मिळणार आजोबांची जमीन, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय

Hair Care: केसातील कोंडा आणि खाजेपासून मिळवा आराम; नारळाच्या तेलात मिसळा 'ही' एक गोष्ट

SCROLL FOR NEXT