Prakash Ambedkar News Saam Tv
मुंबई/पुणे

Maharashtra Political News : वंचित गेम चेंजर ठरणार? प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे का? वाचा सविस्तर

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीसोबत यावे यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. वंचितची शिवसेनेसोबत युती झाली आहे.

प्रविण वाकचौरे

Maharashtra Political News :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक काल मंबईत पार पडली. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनाही या बैठकीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. तरी देखील महाविकास आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आपल्यासोबत येतील असा दावा करत आहेत.

प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावे यासाठी महाविकास आघाडीचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. मात्र अद्याप याबाबत तोडगा निघालेला नाही. वंचितची शिवसेनेसोबत युती झाली आहे. शरद पवारांसोबतही प्रकाश आंबेडकर यांची चर्चा झाली आहे. कॉंग्रेसचे काही नेतेही आंबेडकरांच्या संपर्कात आहेत. मात्र महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्यासाठी एवढी आग्रही का आहे, हे देखील तितकचं महत्त्वाचं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचे का?

वंचितला महाविकास आघाडीमध्ये सहभागी करुन घ्यावं असा आग्रह वाढत आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला होता. काँग्रेस-राष्ट्रवादीला अनेक जागा वंचितमुळे गमवाव्या लागल्या होत्या.

२०२९ च्या निवडणुकीत फटका

सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण,राजेंद्र शिंगणे, राजू शेट्टी, माणिकराव ठाकरे अशा बड्या नेत्यांना वंचितने विजयापासून दूर ठेवलं होते. वंचितच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांचा फटका काँग्रेस राष्ट्रवादीच्या उमेदवारांना बसला होता. वंचितचा थेट फायदा भाजपला झाला होता. त्यामुळे युतीचे जवळपास ८-९ खासदार ज्यादा निवडून आले होते.

मतांचं विभाजन टाळता येईल

वंचित बहुजन आघाडीचे मतदार आणि महाविकास आघाडीचे मतदार प्रामुख्याने महायुतीविरोधी आहेत. त्यामुळे प्रकाश आंबेडकर सोबत आले तर मतदारांमधील विभाजन टाळता येईल. दलित मतदारांमध्ये प्रकाश आंबेडकरांचा मोठा प्रभाव आहे. त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bank Account: जुनं बँक अकाउंट वापरत नाही? आजच करा हे काम अन्यथा खिशाला बसेल फटका

Katrina Kaif : निखळ हास्य अन् चेहऱ्यावर ग्लो; आई झाल्यानंतर कतरिना कैफ पहिल्यांदाच दिसली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीतून राष्ट्रवादी घेणार माघार

Veen Doghantali Hi Tutena : समरसोबतची मैत्री तुटली, आनंदचा आत्महत्येचा प्रयत्न; स्वानंदी दोन जिवलग मित्रांना कसं जवळ आणणार? | VIDEO

Viral Video: मोपा विमानतळावर रानगव्याची एन्ट्री, कर्मचाऱ्यांसह प्रवासी घाबरून पळू लागले; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT