Thackeray group And BJP Party worker Face Off  
मुंबई/पुणे

Loksabha Election: कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकाऱ्यांचा राडा; नार्वेकरांना पाहून उबाठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी

Loksabha Election Thackeray group And BJP Party worker Face Off : : आज राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पडला. राज्यातील मतदानाचा आज अखेरचा टप्पा होता. या अखेरच्या टप्प्यात मुंबईच्या ६ जागांसह १३ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गणेश कावडे, साम प्रतिनिधी

मुंबई : कुलाब्यात ठाकरे गट आणि भाजप पदाधिकारी आमनेसामने आले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना पाहून जोरदार घोषणाबाजी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेले होते त्यावेळी किरकोळ कारणांवरून भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

म्युनसिपल सेंकडरी स्कूल येथील मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. दोन्ही पक्षातील कार्यकर्ते आमनेसामने आल्याचं पाहून पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

आज राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पडला. राज्यातील मतदानाचा आज अखेरचा टप्पा होता. या अखेरच्या टप्प्यात मुंबईच्या ६ जागांसह १३ मतदारसंघातील उमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये कैद झालं. अनेक मतदान केंद्रातील ईव्हीएम बंद पडल्याने आणि कार्यकर्त्यांच्या राड्यामुळे पाचवा टप्पा चर्चेत राहिलाय. अनेक ठिकाणी शिवसेनेचे आणि ठाकरे गटाचे कार्यकर्त्ये आमनेसामने आलेत.

कुलाब्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे मतदान केंद्रावर आढावा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमनेसामने आलेत. कार्यकर्त्यांनी एकमेकांना पाहून घोषणाबाजी केली त्यावेळी दोन्ही बाजुचे मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत प्रकरण हाताळले. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांनी ५० खोके एकदम ओकेच्या घोषणा दिल्या होत्या.

सायनमध्ये भिडले उबाठा आणि भाजप कार्यकर्ते

काँग्रेस व शिवसेना उबाठा कार्यकर्त्यांसोबत भाजप कार्यकर्त्यांचा राडा झाला. तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते सायन पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले होते. काँग्रेस कार्यकर्त्याने धमकावल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला होता. राडा झाल्यानंतर भाजप आमदार प्रसाद लाड सायन पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री फडणवीस ॲक्शन मोडमध्ये! टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी पोलिस आयुक्तांना फोन

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

SCROLL FOR NEXT