Kalyan: शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट प्रदीप भणगे
मुंबई/पुणे

Kalyan: ऐन उन्हाळ्यात मलंगगड भागात विजेचा लपंडाव; शिवसेनेचा आंदोलनाचा इशारा

Kalyan Latest News: शिवसेनेच्या कल्याण पूर्वेतील शिष्टमंडळाने गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून तातडीने लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रदीप भणगे

कल्याण: कल्याण जवळील मलंगगड भागात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. एकीकडे गर्मी वाढली असताना दुसरीकडे महावितरणकडून (MSEDCL) रात्रीच्या सुमारास लोडशेडिंग (Load Shedding) केले जात असल्याने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कल्याण पूर्वेतील शिष्टमंडळाने गुरुवारी महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली असून तातडीने लोडशेडिंग रद्द करण्याची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक महेश गायकवाड (Mahesh Gaikwad) यांच्याकडून देण्यात आला आहे. (Load shedding issue in malanggad shivsena gives ultimatum to msedcl for regular power supply)

हे देखील पहा -

दिवसेंदिवस उन्हाचा पारा हा झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे उष्णतेने नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. असं असताना कल्याण (Kalyan) जवळील मलंगगड (MalangGad) भागात गेल्या काही दिवसांपासून महावितरणकडून रात्री दहा वाजल्यापासून ते रात्री एक वाजेपर्यंत लोडशेडिंग केले जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच संतापाची लाट उसळली आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू झाल्या असून विद्यार्थी परीक्षांच्या तयारी करत आहेत.

अनेकांच्या घरांमध्ये लहान मुले देखील आहेत. त्यामुळे महावितरणच्या लोडशेडिंगचा फटका या मुलांना तर पडतच आहे याशिवाय सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसत आहे. यासाठी गुरुवारी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आणि जर लोशेडिंग बंद केले नाहीतर शिवसेना उग्र आंदोलन करेल असे शिवसेनेचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी सांगितले.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये मराठा आंदोलकांचं पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू

Ration Card Free Ration: रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर! २५ सप्टेंबरदरम्यान साखर फक्त १८ रुपये किलो, मोफत गहू-तांदूळ मिळणार

Eknath Shinde : शिंदेसेनेला मोठा धक्का! ठाण्यातील नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे पद रद्द

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या घरात कोणाची सत्ता चालणार? 'हा' सदस्य ठरला पहिला कॅप्टन, गेममध्ये नवा ट्विस्ट

EPFO ची मोठी घोषणा! लग्न, शिक्षण, वैद्यकीय खर्चासाठी काढता येणार भरघोस रक्कम; पाहा A to Z प्रक्रिया

SCROLL FOR NEXT