पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; पाहा Video Saam TV
मुंबई/पुणे

पुणे महापालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयात दारुच्या पार्ट्या; पाहा Video

पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचे (Pune Muncipal Corporation) मामाराव दाते मुद्रणालय आहे.

अश्विनी जाधव - केदारी

पुणे: पुण्यातील घोले रस्त्यावर महापालिकेचे (Pune Muncipal Corporation) मामाराव दाते मुद्रणालय आहे. येथे सुरक्षा रक्षक मध्यरात्री तीन ते चार वाजेपर्यंत मद्याच्या पार्ट्या करतात. पार्ट्या करण्यासाठी सुरक्षा विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील सामील असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच, सांस्कृतिक भवनातील काही वस्तू चोरीला गेल्याचा प्रकार ही उघडकीस आला आहे.  शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञातां विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.

सांस्कृतिक भवनातील सुरक्षा रक्षक ओंकार गुरूड हे गुरुवार (ता.२३) रोजी पंडित जवाहरलाल नेहरू आर्ट गॅलरी येथे रात्रपाळीत सुरक्षा बजावत असताना सांस्कृतिक भवनातील हातगाडी, पाणीपुरी गाडी चोरून नेतांना त्या चोरांला पकडताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याने त्यांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये दोन अज्ञाता विरोधात तक्रार दाखल केली. प्रशासन, स्थानिक आमदार, नगरसेवक यांनी लक्ष देऊन कारवाई करावी अशी मागणी ओंकार गुरूड यांनी केली आहे. "परवा सुरक्षा रक्षकांचे सुपरवायझर आले होते तेव्हा त्यांनी चौकशी केली. तोपर्यत आम्हाला काहीच माहित नव्हतं. या आगोदर अशी घटना घडली नव्हती. सबंधित घटनेची चौकशी करायला सांगितले आहे".

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Heatwave: महाराष्ट्रात उष्णतेची लाट! विदर्भ चाळीशीपार; अकोला, अमरावतीसह ८ शहरांमध्ये सर्वाधिक तापमान

Sangli Breaking : वादळी वाऱ्यामुळं भिंत कोसळली, देवीच्या कार्यक्रमाला आलेल्या ६ भाविकांचा दबून मृत्यू

Maharashtra News Live Update: मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी अपडेट, १५ लाखांत विकली प्रश्नपत्रिका; नांदगावच्या BAMS च्या विद्यार्थ्याचे कनेक्शन काय?

PM मोदींच्या आवाहनानंतर महाविकासआघाडीचे अनोखे आंदोलन; थेट घोड्यावरून काढली सवारी

SCROLL FOR NEXT