Ruby Hall Saam TV
मुंबई/पुणे

Ruby Hall: किडनी तस्करी महागात; मानवी अवयव प्रत्यारोपण केंद्राचा परवाना रद्द

मात्र सारिका सुतार हिच्या किडनी तस्करीची बातमी साम टिव्ही न्युजवर दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली.

गोपाल मोटघरे

पुणे: कोल्हापूर येथील सारिका सुतार ह्या विधवा महिलेची किडनी पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक मध्ये खोटे कागदपत्र तयार करून दलालाने विकली होती. सारिका सुतार हिच्या अज्ञान पणाचा फायदा घेऊन रवी भाऊ ह्या दलालाने रुबी हॉल क्लिनिकमध्ये तिची किडनी अमित साळुंखे ह्या व्यक्तीला 15 लाख रुपयात बेकायदेशीरपणे विकली होती. त्यामूळे रुबी हॉल क्लिनिक येथील मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

मात्र सारिका सुतार हिच्या किडनी तस्करीची बातमी साम टिव्ही न्युजवर दिल्यानंतर राज्यात मोठी खळबळ निर्माण झाली. सारिका सुतार किडनी तस्करी प्रकरण आम्ही साम टीव्ही न्युजवर उचलून धरल्या नंतर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ह्या प्रकरणाची एक समिती नेमून लगेच चौकशी सुरू केली होती.

आता ह्या चौकशी समितीने रूबी हॉल क्लिनिक येथील मानवी अवयव प्रत्यारोपण प्रक्रियेवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करत, ग्रँट मेडिकल फाउंडेशनच्या रुबी हॉल क्लिनिकचा मानवी अवयव प्रतयारोपण परवाना रद्द केला आहे. आरोग्यसेवा आयुक्तालयाने रूबी हॉल क्लिनिक वर मानवी अवयव प्रत्यारोपण परवाना रद्द करताना अनेक ताशेरे ओढले आहेत. मात्र हे प्रकरण सुरुवातीपासून साम टिव्ही न्यूजने उचलून धरल्याने आम्हाला थोडेफार का होईना नक्की न्याय मिळणार असा विश्वास या प्रकरणातील तक्रारदार आणि पीडित मध्ये निर्माण झाला आहे.

रूबी हॉल क्लिनिकमध्ये यापूर्वी अनेकदा मानवी अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत. त्यामूळे यापूर्वी देखिल रुबी हॉल क्लिनिक मध्ये मानवी अवयव प्रत्यारोपण करताना काही गैरव्यवहार झाले का ? ह्याची चौकशी करण्याची गरज आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२, ३ की ४? घर बांधताना किती मजल्यांना मिळते परवानगी? जाणून घ्या काय आहेत बिल्डिंग बायलॉज नियम

Heart Failure ची सुरुवात कशी होते? छातीत दुखणं हे लक्षण नाही, डॉक्टरांनी सांगितली 7 संकेत

Maharashtra News Live Update: शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकरी आक्रमक

Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Political News : विरोधक एकवटले, विजय थलपती यांचे सरकार कोसळणार? राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

SCROLL FOR NEXT