हडपसरच्या नागरी वस्तीत बिबट्याचा वावर; स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण सागर आव्हाड
मुंबई/पुणे

हडपसरच्या नागरी वस्तीत बिबट्याचा वावर; स्थानिकांमध्ये भितीचे वातावरण

चेतन तुपे वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासमवेत बिबट्याचा ज्या भागात वावर आहे त्या भागाची पाहणी करण्यात आली.

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे: हडपसर (Pune Hadpasar) येथील साडेसतरानळी येथे गेले तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर आहे. येथील स्थानिक शेतकऱ्यांनी व रहिवाशांनी याबाबत या भागाचे आमदार म्हणून चेतन तुपे (MLA Chetan Tupe) यांना या गोष्टिची माहिती दिली व तेथील बिबट्याच्या वावराचे अस्तित्व जाणवून देणाऱ्या पायांच्या ठशांचे फोटो पाठवले. हे फोटो चेतन तुपे यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवले आणि याबाबत त्यांची मदत मागविण्यात आली आहे.

चेतन तुपे वनविभागाचे अधिकारी व स्थानिक नागरिक व शेतकरी यांच्यासमवेत बिबट्याचा ज्या भागात वावर आहे त्या भागाची पाहणी करण्यात आली. त्याच बरोबर या भागातील शेतकऱ्यांनी काही दिवसात या भागातील कुत्र्यांची संख्या कमी झाल्याचे सांगितले व एका प्रत्यक्षदर्शीने बिबट्या रात्री कुत्र्यांची शिकार करून त्यांना झाडीमध्ये नेत असल्याची माहिती दिली.

एका स्थानिक नागरिकाच्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्या कैद झाला. आमदार चेतन तुपे यांनी वनविभागाकडे या नागरी वस्तीत आलेल्या बिबट्याच्या त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. त्याच बरोबर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. शेतात काम करत असताना खाली बसून काम करणे टाळणे व आपल्या जवळील मोबाईल मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावावीत जेणेकरून आवाजामुळे बिबट्या त्या भागात येणाक नाही अशाही सूचना वनविभागाने केलेले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

Pune Waterfall : जंगलाच्या कुशीत लपलेला सुंदर धबधबा! पुण्यापासून अवघ्या काही अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण

SCROLL FOR NEXT