Leopard Attack Saam tv
मुंबई/पुणे

बिबट्या आला रे...! आधी गावात दहशत, आता पुणे शहरात एन्ट्री, VIDEO

leopard in pune city : पुण्याच्या ग्रामीण भागात बिबट्याने धुमाकूळ घातलाय. मात्र आता पुणे शहरातही बिबट्या आल्याने नागरिकांमध्ये दहशत आहे. पुण्यात कुठे बिबट्या दिसला? वन विभागाने काय आवाहन केलंय. ? पाहूया एक रिपोर्ट..

Suprim Maskar

पुण्यात रविवारी सकाळी औंध भागातल्या सिंध सोसायटी मध्ये बिबट्याचे दर्शन झाले. या ठिकाणी असलेल्या सीसीटिव्ही मध्ये बिबट्या कैद झाला. याची माहिती मिळताच वन विभागाचं पथक आणि RESQ टीम औंधमध्ये दाखल झाली. मात्र शोध घेऊनही बिबट्या सोमवारपर्यंत कुठेच दिसून आला नाही.

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातलाय. शिरूर मध्ये एका मुलाचा बिबट्याने जीव घेतल्याची घटना ताजी आहे.ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी बिबट्याकडून होणारे हल्ले थांबण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असतानाच आता बिबट्याची थेट पुणे शहरात एन्ट्री झाल्याने भीतीचे वातावरण आहे.

याआधी पुण्यात कधी दिसला होता बिबट्या ते पाहूया

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात 19 नोव्हेंबर रोजी दोनदा बिबट्या आढळला होता.

फेब्रुवारी मध्ये निगडीमध्ये बिबट्या दिसला होता. वनविभागाच्या मदतीने त्याला पकडण्यात आले होते.

14 नोव्हेंबरला शेवाळीवाडी परिसरात बिबट्या दिसला. त्यानंतर फुरसुंगी परिसरातही बिबट्या दिसल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

पुणे शहरातील औंध सारख्या दाट वस्तीच्या भागात बिबट्या आल्याने स्थानिकांमध्ये चिंता वाढली आहे. वन विभागाने सतर्क राहण्याचे आवाहन केलं आहे. मात्र मानवी वस्तीमध्ये बिबट्याचा वावर वाढत चालल्याने याला जबाबदार कोण आहे? हा प्रश्न महत्वाचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

Bhindi health benefits: भेंडी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतात? तज्ज्ञ डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT