Leopard in Thane, साम टीव्ही मराठी
मुंबई/पुणे

Thane : ठाण्यात बिबट्याची दहशत! वागळे इस्टेट परिसरात पाणी पिताना दिसला; व्हिडिओ व्हायरल

Thane leopard news : ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पुन्हा बिबट्याचा वावर दिसून आला आहे. हनुमान नगर भागात बिबट्या पाणी पितानाचा व्हिडिओ व्हायरल झाला.

Namdeo Kumbhar

विकास काटे, ठाणे प्रतिनिधी

leopard spotted in Thane Wagle Estate : ठाणेकरांनो घराबाहेर पडताय? त्याआधी सावध व्हा. होय, कारण वागळे इस्टेट परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढला आहे. हनुमान नगर भागातील एक थरारक व्हिडिओ समोर आला आहे. फॉरेस्ट चौकीजवळ बिबट्या बिनधास्तपणे पाणी पिताना कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. काय आहे नेमका हा प्रकार? जाणून घेऊयात..

ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील हनुमान नगर येथील जनरल मुस्लिम कब्रस्तान-फॉरेस्ट ऑफिसजवळ बिबट्या पाणी पिताना दिसल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. मामा-भांजे दर्ग्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील फॉरेस्ट चौकीजवळील हा व्हिडिओ असल्याची माहिती मिळत आहे. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पाहा व्हायरल व्हिडिओ...

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील वागळे विभागातील हनुमान नगर भागातही बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यामुळे या बिबट्याला वनविभागाच्या माध्यमातून लवकरात लवकर जेरबंद करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी करत आहेत. काही दिवसांपूर्वीच ठाण्यात बिबट्या आढळला होता. त्यावेळीही नागरिकांमध्ये भीतीचे वातवऱण होते. पण अद्याप कोणत्याही उपया योजना केल्या नसल्याचे दिसतेय, कारण पुन्हा एकदा बिबट्या आढळला आहे.

बिबट्याच्या दर्शनामुळे ठाण्यातील वागळे विभाग, लोकमान्य नगर, इंदिरानगर, रूपादेवी पाडा आणि हनुमान नगर येथील रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटेच्या वेळी बिबट्याचे दर्शन वारंवार होत असल्याने नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत आहेत. दरम्यान, वनविभागाच्या वतीने ठाण्यातील विविध ठिकाणी बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. पण बिबट्या नागरी वास्तीत मोकात असल्याचे दिसतेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: संतोष देशमुख हत्या प्रकरण, साक्षीदाराच्या भावाला धमकी

'तटकरेंना आमचा विरोध', शिंदेंसेनेच्या आमदाराच्या मुलीनं भरला उमेदवारी अर्ज, कोकणात युतीला तडा

Kalyan : साखरपुडा मोडून मुलीनं बॉयफ्रेंडसोबत लग्न केलं, वडील संतापले, नवविवाहीत माहेरी येताच नको ते करून बसले

New Marathi Serial: मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासात पहिल्यांदाच; तीन महिन्यांत सुरु होणार आठ नव्या मालिका

Manoj Jarange: मनोज जरांगेंच्या उपोषणादरम्यान सरकारची मोठी कारवाई, बड्या अधिकाऱ्याचं निलंबन

SCROLL FOR NEXT