Leopard Attack CCTV  Saam Tv
मुंबई/पुणे

Leopard Attack CCTV : दबक्या पावलाने आला पण धूम ठोकून पळाला; कुत्र्याने बिबट्याची केली फजिती, पाहा VIDEO

Leopard Attack On Dog in Pune Alephata : आळेफाटामध्ये बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना घडली. हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय.

Rohini Gudaghe

रोहिदास घाडगे, साम टीव्ही पुणे

पुण्याच्या आळेफाटा मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने कुत्र्यावर हल्ला केलाय. यावेळी कुत्रा जीव वाचविण्यासाठी बंगल्याच्या दरवाजा जवळ मोठमोठ्याने भुंकत होता. त्याच्या बचावासाठी मालकाने धाव घेतली तत्पूर्वी बिबट्याने घाबरून धूम ठोकली. बिबट्याच्या हल्ल्याचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय.

पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात बिबट्याने मध्यरात्री कुत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुत्र्याने मोठ्याने भुंकायला सुरूवात केली, त्यामुळे बिबट्याने पळ काढला. कुत्रा भुंकत असताना घराचे मालक दरवाजा उघडून बाहेर (Leopard Attack On Dog) आले, त्यामुळे मात्र बिबट्याने माघार घेतली. हा सगळा थरार सीसीटिव्हीमध्ये टिपला गेलाय. आजवर अनेक पाळीव कुत्र्यांची शिकार पुण्यात बिबट्याने केलीय.

बिबट्याने धूम ठोकली

परंतु व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्रा बिबट्यावर भारी पडलेला (Pune News) आहे. घराच्या मालकाने कुत्रा अडचणीत आहे, याची चाहूल लागताच लाईट लावून आल्यामुळे कुत्र्याचा जीव वाचलेला आहे. व्हिडिओमध्ये दिसतंय की, कुत्रा घराच्या ओट्यावर बसलेला आहे. एवढ्यात एक बिबट्या अतिशय हलक्या पावलाने येत (Leopard Attack Video) आहे. बिबट्या कु्त्र्यावर हल्ला करणार, इतक्यात कुत्र्‍याचा आवाज ऐकून घरमालक दरवाजा उघडतो अन् बिबट्या धूम ठोकतोय.

यापूर्वी घडलेली घटना

नारायणगाव जवळील वारुळवाडी येथे घरासमोर दोन कुत्रे गस्तीवर होते. तेव्हा शिकारीसाठी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने एका कुत्र्यावर झडप टाकुन घेऊन गेला. यावेळी बिबट्याचा हल्ला दुसऱ्या कुत्र्याने (Leopard Attack On Dog) पाहिला. मात्र, बिबट्याला विरोध करण्याची क्षमता नसल्याने कुत्र्यालाही बघ्याचीच भुमिका घ्यावी लागली होती. एकीकडे भटक्या कुत्र्यांची संख्या वाढतेय तर दुसरीकडे बिबट्याचे हल्ले वाढत आहेत. पुणे जिल्ह्यात बिबट्यासह आता कुत्र्यांचाही बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नगरमधील पॅथॉलॉजिकल लॅबचे तज्ञ डॉक्टरांवर गंभीर गुन्हे दाखल

राज ठाकरे राजकारणातील नापास माणूस; अजित पवारांच्या पायाची धूळ, सदावर्तेंनी पुन्हा डिवचलं

Smriti Mandhana Marriage: स्मृती मानधनाचं ठरलं! कोणाशी बांधणार लगीनगाठ?

Kalyan : कल्याणमध्ये केडीएमसीच्या घंटागाडीची दुचाकीला धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी, व्हिडिओ व्हायरल

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT