Pune shirur News : Saam tv
मुंबई/पुणे

Pune : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ; १३ वर्षीय मुलाचा जीवघेणा हल्ल्यात मृत्यू, ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं

Pune shirur News : पुण्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरु आहे. बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाचं कार्यालय पेटवलं.

रोहिदास गाडगे

पुण्यातील शिरुर तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू

गेल्या १५ दिवसांत पिंपरखेड परिसरातील तिसरी बिबट्या हल्ल्याची घटना

संतप्त ग्रामस्थांनी बेल्हा-जेजुरी महामार्ग रोखला

वनविभागाचं कार्यालय आणि वाहन पेटवलं

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याने चिमुकल्यावर हल्ला केला. हिंसक बिबट्याच्या हल्ल्यात १३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. घराजवळ खेळत असताना शेजारील शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने मुलावर हल्ला केला. महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेल्याने परिसरातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत.

३ वर्षीय रोहण विलास बोंबे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. रोहण घराजवळ खेळत होता. त्यावेळी शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात तिसरा बळी गेला आहे. गेल्या १५ दिवसांत पिंपरखेड गावात ६ आणि जांबूतमध्ये ३ असे एकूण ९ हिंसक बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. पिंपरखेड येथे १५ दिवसातील तिसरी घटना आहे. पुण्यात बिबट्यांची संख्या १२०० वर गेली आहे.

गावात तिसरा बळी गेल्याने संतप्त ग्रामस्थ आणि पोलिसांत तणाव निर्माण झाला आहे. बेल्हा जेजुरी महामार्ग रोखण्यासाठी ग्रामस्थ जमा झाले. चिमुकल्याचा मृतदेह घरासमोर ठेवून आंदोलन करत आहेत. बिबट्याच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठोस भूमिका शासनाकडून घेतल्याशिवाय रोहन बोंबे या मुलाचा अंत्यविधी करणार नाही, अशी भुमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचा चिमुकल्यावर हल्ल्यानंतर ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाचे कार्यालय पेटवून दिलं आहे. वनविभागाची गाडी पेटवल्यानंतर आता नागरिकांनी वनविभागाचे कार्यालयाला लक्ष केलं. यामुळे वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT