Ujjwal Nikam Saam Tv
मुंबई/पुणे

Ujjwal nikam: सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? मराठा आरक्षणावर उज्ज्वल निकम महत्वाचे बोलले

Maratha Reservation :कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील याबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मराठा आरक्षणात आपल्या सग्यासोयाऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यामुळे सरकारला तोडगा काढणे अडचणीचे झाले.

Vishal Gangurde

Maratha Reservation :

मराठा समाजासाठी आज मोठा आनंदाचा दिवस आहे. कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्याला मोठा यश मिळालं आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या 'सगेसोयरे' शब्दाची व्याख्या यासह अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत.

मात्र सरकारने मान्य केलेली 'सगेसोयरे'बाबतची मागणी न्यायालयात टीकेल की नाही याबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील तसा दावा केला आहे. (Latest Marathi News)

कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी देखील याबाबत महत्त्वाची टिप्पणी केली आहे. मराठा आरक्षणात आपल्या सग्यासोयाऱ्यांनाही आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली. यामुळे सरकारला तोडगा काढणे अडचणीचे झाले.

कायद्याच्या चौकटीत सगेसोयरे कोणाला म्हटलं जावं याबाबत उज्ज्वल निकम यांनी म्हटलं की, सगेसोयरे ही मराठीमध्ये मोठी व्यापक व्याख्या आहे. त्यामुळे याची व्याख्या करताना सरकारला जवळचे नातेवाईक की एका गावचे जवळचे लोक हे निश्चित करून घ्यावे लागेल. नातेवाईकांमध्येही मुलाकडील नातेवाईक की मुलीकडील नातेवाईक हे ठरवताना, हा विषय देखील वादाचा विषय होऊ शकतो.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सागेसोयरे कोणाला म्हणायचे हे निश्चित करावे लागेल. नातेवाईक हे देखील ठरून घ्यावे लागेल. जोपर्यंत सगेसोयरे या शब्दाच्या स्पष्ट अर्थ निश्चित केला जात नाही, तोपर्यंत नुसता सगेसोयरे या शब्दामुळे आरक्षणाचा गुंता अधिक वाढू शकणार असल्याची प्रतिक्रिया जेष्ठ कायदे तज्ञ उज्वल निकम यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Commonwealth Games 2026: 36 वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली! भारतीय ज्युडोपटूंचा इतिहास; अस्मिता डे आणि हर्ष सिंह यांची सुवर्णपदकाची कमाई

Maharashtra News Live: आदेश आला तर मंत्रीपद सोडण्याची तयारी- भरत गोगावले

गुलाबी अदा! प्राजक्ता माळीचे सुंदर फोटो पाहून नजर हटत नाही

BJP: मोठी बातमी! भाजपला मोठा हादरा, आमदाराचा तडकाफडकी राजीनामा

नीट पेपर फुटतो कसा? सुप्रिया सुळेंचा आक्रमक सवाल; सरकारला या २ गोष्टी सूचवल्या, बघा VIDEO

SCROLL FOR NEXT