Gautami Patil Saam tv
मुंबई/पुणे

Gautami Patil : मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मलाही कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहीजे : गौतमी पाटील

Gaurami Patil Demands maratha Reservation: काही कलाकार देखील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यात आता लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची भर पडली आहे. 'मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी गौतमी पाटीलने केली आहे.

Vishal Gangurde

अक्षय बडवे, पुणे

Gautami Patil Latest News:

मराठा आरक्षणावरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी एकीकडे राज्यभर सभांचा धडाका लावला आहे. तर दुसरीकडे काही कलाकार देखील मराठा आरक्षणाची मागणी करत आहेत. त्यात आता लावणी नृत्यांगणा गौतमी पाटीलची भर पडली आहे. 'मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, अशी मागणी गौतमी पाटीलने केली आहे. (Latest Marathi News)

लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिने पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी गौतमी पाटीलने मराठा आरक्षणावर मोठं केलं आहे. गौतमी पाटील म्हणाली, 'मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. आज अनेकांना आरक्षण हवंय, त्यामुळे ते मिळालंच पाहिजे. मलाही आरक्षण हवंय. मला देखील कुणबी प्रमाणपत्र हवंय'.

'कोरोना काळात माझी परिस्थिती खूप हलाखीची झाली होती. हे क्षेत्र चालायला हवं. आता सगळं नीट सुरू आहे, असं गौतमी म्हणाली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

गौतमी पाटीलची सहकारी हिंदवी पाटीलनं वेगळा फड निर्माण केला आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघी एकत्र डान्स करतानाही दिसत नाहीत. यावर भाष्य करताना गौतमी पाटील म्हणाली, 'हिंदवी पाटीलचं चांगलं होवो. आमच्यातून कोण फुटून गेलं, तर आम्ही त्याला गद्दार अजिबात म्हणत नाही. त्यांचं उलट चांगलं होऊ दे'.

गौतमीने यावेळी बोलताना राजकारणात जाणार नसल्याचेही स्पष्ट केले. 'मी अजिबात राजकारणात जाणार नाही. नवा चित्रपट मिळाला तर करेन. चित्रपट मिळाला तरी डान्स करणे सोडणार नाही'. तसेच सध्या माझ्या डोक्यात लग्नाचा अजिबात विचार नाही, असंही गौतमीने स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: हाय बीपीचा त्रास एका रात्रीत होत नाही; शरीरात दिसतं हे 1 सायलेंट लक्षण

Sonam Wangchuk: 'अन्यायापासून ते मुक्तीपर्यंत...' सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून पहिला मेसेज, २० जुलैसाठी देशवासियांना आवाहन

Maharashtra News Live Update: हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पगार, DA आणि पेन्शनमध्ये होणार मोठा बदल

Health Tips After 40: वयाच्या 40 नंतर या 8 सवयी लगेचच बदला; अन्यथा आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम

SCROLL FOR NEXT