Mumbai Latest News Saam Tv
मुंबई/पुणे

पाेलीस कारवाईच्या नाराजीतून मंंत्रालया समोर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न; अनर्थ टळला

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंंत्रालया समोर महिलेचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

सुरज सावंत

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. काल विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी एका महिलेने अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याच प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी (Police) तिला रोखल्याने मोठा अनर्थ टळला. साराबाई पाखरे असे या ६० वर्षीय महिलेचे नाव आहे. पाखरे हिच्यावर घाटकोपर येथील एका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने नोंदवून तिला अडकवल्याचा आरोप होता. या प्रकरणी संबधित पोलिसांवर कारवाई व्हावी.

तसेच आपल्यवरील गुन्हा रद्द व्हावा. या मागणीसाठी तिने विविध ठिकाणी प्रयत्न करून यश न आल्यने पाखरे यांनी काल सायंकाळच्या सुमारास मंंत्रालयच्या मुख्य इमारती समोर अंगावर राॅकेल ओतून स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी तिला रोखले, या प्रकरणी मरीनड्राइव्ह पोलिसांनी साराबाई पाखरे हिला ताब्यात घेतले असून तिला सीआरपीसी ४१ (ब) अन्वेय नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे शिक्षक व पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध मनाई आदेश जारी

बिश्नोई गँगच्या नावाखाली राजकीय हत्या होणार? दसरा मेळाव्यानंतर राऊतांचा खळबळजनक दावा

District Bank Elections: राज्यात जिल्हा बँक निवडणुकीचा धुरळा; बिनविरोध निवडणुकीसाठी नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

सर्वोच्च न्यायालयाचा सहकार सम्राटांना मोठा धक्का; 10 वर्ष पूर्ण केलेल्या संचालकांना निवडणुकीत बंदी

Maharashtra MLC Elections: महायुतीत कुठे दिलजमाई, कुठे बंडखोरी कायम; 5 मतदारसंघात कुणामध्ये रंगणार लढत?

SCROLL FOR NEXT