BEST Bus Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Kurla Bus Accident: कुर्ला बस अपघातानंतर चालकाला संतप्त नागरिकांकडून मारहाण, पाहा VIDEO

BEST Bus Accident: कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालकाला पकडून नागरिकांनी चांगला चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

Priya More

कुर्ल्यामध्ये सोमवारी रात्री भरधाव बेस्ट बसने अनेक वाहनांना चिरडल्याची धक्कदायक घटना घडली होती. या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू आणि ४९ जण जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसच्या चालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओ समोर आला आहे. या अपघातानंतर चालक संजय मोरे (५४ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय मोरेने पोलिस चौकशीदरम्यान धक्कादायक माहिती दिली.

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर चालकाने बसमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले होते. तसंच, बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा त्याने दावा केला होता. पण तपासातून धक्कादायक माहिती उघड झाली. मात्र संजय मोरे हा १ डिसेंबर रोजी कंत्राटपदावर रुजू झाला होता. तो आधी खासगी वाहनं चालवत होता. त्याला मोठ्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. अपघाताच्या दिवशी पहिल्यांदाच त्याने बेस्ट बस चालवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! मनोज जरांगे यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारकडून सर्व मागण्या मान्य

Maharashtra News Live Update: पनवेलमध्ये ऑनलाईन सट्टेबाजी रॅकेटवर पोलिसांचा छापा

मोठी दुर्घटना! पाच मजली इमारत कोसळली; सिमेंटच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण दबल्याची भीती

अजित पवार गटाच्या नेत्याकडून महिलेचा विनयभंग; विधवेकडे नगरसेवकानं केली शरीरसुखाची मागणी

सासूसाठी सुनबाई बिबट्याशी भिडली, संकटात नातूनेही दाखवलं धाडस

SCROLL FOR NEXT