Rinku Rajguru-Krishnaraaj Mahadik photo viral Saam tv
मुंबई/पुणे

Rinku Rajguru-Krishnaraaj Mahadik : आधी फोटो आता स्टेटसची चर्चा; रिंकू-कृष्णराजच्या फोटोची इनसाईड स्टोरी, VIDEO

Rinku Rajguru-Krishnaraaj Mahadik photo viral : अभिनेत्री रिंकू राजगुरू आणि कृष्णराज महाडिक यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यांच्या व्हायरल फोटोने सोशल मीडियावर धुमाकुळ घातला आहे.

Tanmay Tillu

लाखो हदयाची धडकन असणाऱ्या सैराटफेट आर्चीला म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरूला रिअल लाईफमध्ये परश्या मिळाल्याच्या चर्चानी जोर धरलाय. मात्र परश्यानं या सर्व चर्चा नाकारल्यात...कोल्हापुराच्या रांगड्या मातीत नेमकं काय घडतंय...पाहूया...

सैराट चित्रपटातील अर्ची म्हणजेच रिंकू राजगुरू सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलीये.. कोल्हापुरातील भाजपचे नेते धनंजय महाडिकांचे चिरंजीव कृष्णराज महाडिकांनी पोस्ट केलेल्या एका फोटोनंतर ही चर्चा चालू झालीये.. त्यानंतर आता रिंकू राजगुरूच्या इन्स्टाग्राम स्टोरीचेही वेगवेगळे अर्थ काढले जातायत..रिंकू राजगुरूने तिच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये ती पंजाबी ड्रेसमध्ये दिसतेय.. तिच्या कपाळावर कुंकू दिसतंय.. विशेष म्हणजे तिच्या कपाळी अर्धचंद्राच्या आकाराची लाल रंगाची टिकलीही दिसतेय.

रिंकू राजगुरू या फोटोमध्ये नजर खाली झुकवलेल्या स्थितीत दिसत आहे. तिच्या याच सूचक स्टेटसची सध्या सगळीकडे चर्चा रंगलीये..दरम्यान याआधी कृष्णराज महाडिक यांनी 10 फेब्रुवारी रोजी रिंकू सोबतचा महालक्ष्मी मंदिरातला फोटो पोस्ट केला होता. अखेर या फोटो मागची इनसाईड स्टोरी समोर आलीये. स्वतः कृष्णराज यांनी साम टीव्हीला ही माहिती दिली.

फेब्रुवारीचा महिना सुरुए...व्हॅलेंटाईन डे अगदी तोंडावर आहे. अशात कोल्हापुरच्या रांगड्या मातीत रिंकू-कृष्णराजच्या फोटोमुळे चर्चा झाली नसती तर नवलच...मात्र कृष्णराजनं या सगळ्या शक्यतांवर पडदा टाकलाय..त्यामुळे महाडिकांच्या कृष्णाची राधा त्यांना लवकरच सापडेल अशी अपेक्षा चाहत्यांनी व्यक्त केलीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Junnar ST Bus Accident: गुंजाळवाडीजवळ शेगाव-कल्याण एसटीचा भीषण अपघात; दोन ते तीनवेळा उलटली बस, दोघांचा मृत्यू, १७ जखमी

चित्रपटसृष्टी हादरली! प्रसिद्ध दिग्दर्शकाची आत्महत्या; नदीमध्ये सापडला मृतदेह

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! सिमेंट मिक्सरने दोघांना चिरडलं, वडिलांच्या डोळ्यासमोर ८ वर्षीय अहानाने सोडले प्राण

Dagdusheth Halwai Ganpati: पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला 'अ' वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा

Diesel Crisis: परभणीत डिझेलची टंचाई, पेट्रोल पंपाबाहेर कॅन घेऊन रांगा; पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT