Pune Koyata Gang News  Saam TV
मुंबई/पुणे

Pune News: पुण्यात गटारीच्या दिवशीच कोयता गँगचा धुमाकूळ; कॅम्प परिसरातील वाईन शॉपची तोडफोड, पाहा VIDEO

Pune Koyata Gang News: ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केली.

Satish Daud

पुणे शहरात पुन्हा एकदा कोयता गँगच्या गुंडांनी धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. ऐन गटारीच्या दिवशीच कोयता गँगच्या टोळक्याने एका वाईन शॉपची तोडफोड केली. शहरातील कॅम्प परिसरात रविवारी साडेआठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

पुणे पोलीस आयुक्त याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे. गेल्या वर्षभरापासून पुण्यात कोयता गँगच्या (Koyata Gang) गुंडांनी धुमाकूळ घातलाय. लोकसभा निवडणुकीआधी पुणे पोलिसांनी या गुंडावर कारवाईचा बडगा उगारला होता.

शहरात ठिकठिकाणी वाहनांची तोडफोड (Crime) करत हातात कोयते नाचवणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवला होता. अनेकांची भररस्त्यात वाजत गाजत धिंड देखील काढण्यात आली. काहींना तडीपार देखील करण्यात आलं होतं. मात्र, निवडणुकीनंतर पुन्हा एका शहरात कोयता गँग सक्रिय झाली आहे.

नागरिकांच्या मनात कमी झालेली दहशत पुन्हा निर्माण करण्याचा कोयता गँगच्या गुंडांचा डाव आहे. यातूनच ते शहरात तोडफोड करत असल्याचं समोर आलंय. रविवारी पुणेकर गटारीनिमित्त पार्टी करत असताना ठिकठिकाणी कोयता गँगच्या गुंडांनी अनेकांना धमकावलं. लष्कर पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 अज्ञात हल्लेखोरांनी एका वाईन शॉपची तोडफोड देखील केली.

न्यूयॉर्क वाईन शॉप असं दुकानाचं नाव आहे. कॅम्प परिसरातील घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. विशेष बाब म्हणजे, काही वर्षांपूर्वी देखील कोयता गँगच्या गुंडांनी अशाच एका वाईन शॉपची तोडफोड केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

Actress Father shot: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर भरदिवसा गोळीबार; नेमकं काय घटलं? वाचा घटनाक्रम

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

SCROLL FOR NEXT