Crime News Saam TV
मुंबई/पुणे

पिंपरीत पुन्हा कोयता गँगचा पुन्हा धुमाकूळ, महिला दुकानदारावर हल्ला करत कपड्यांची चोरी

शॉप मालकाच्या आईवर कोयता गँगने वार करत सात हजार पाचशे रुपये किमतीचे तीन शर्ट आणि तीन जिन्स पळविले आहेत.

गोपाल मोटघरे

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरात ब्रॅण्डेड कपडे घालण्यासाठी पुन्हा एकदा कोयता गँगने धुमाकूळ घातला आहे. या गँगने रेडीमेड दुकानांमध्ये कपडे चोरी केले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात चिखली पोलीस स्टेशन हद्दीतील ताम्हाणे वस्ती परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे (Koyta Gang Attack On Shop Keeper And Robber Clothes).

काही दिवसांपूर्वीही कोयता गँगने पिंपरीतील एमजी शूज शॉपमध्ये देखील बुटं चोरी करण्यासाठी दुकानदारावर धारदार शस्त्राने वार करुन मोठी तोडफोड केली होती. काल पुन्हा चिखली येथील ताम्हाणे वस्ती परिसरातील पीसीएमसी फॅशन हब या दुकानात कपडे खरेदी करण्याच्या बाहाण्याने ही गँग घुसली. शॉप मालकाच्या आईवर कोयता गँगने वार करत सात हजार पाचशे रुपये किमतीचे तीन शर्ट आणि तीन जिन्स पळविले आहेत.

कोयता गँगच्या हल्ल्यात कुसुम ईश्वर नागरगोजे ही दुकान मालक महिला गंभीर जखमी झाली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात उदयास आलेल्या छोट्या-छोट्या कोयता गँगमुळे पिंपरी-चिंचवड शहरातील व्यापारी प्रचंड हवाल दिल झाले आहेत

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजू शेट्टींच्या नेतृत्वाखालील जलसमाधी आंदोलन स्थगित; 15 दिवसांत सरकार काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक; काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर, कोणाला मिळाली संधी?

विधानसभा निवडणुकांआधी २ राज्यांत मोठा उलटफेर; काँग्रेसनं मोक्याच्या क्षणी मारला चौका

Maharashtra Politics : भाजप, शरद पवार गटाला मोठा धक्का; माजी मंत्री नाईकांच्या नातीसह शेकडो कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पूर्णेकर हत्येवरून ठाकरे-शिंदे संघर्ष टोकाला, नाईकांनी करावं ठाण्याचं नेतृत्व ' राऊतांनी शिंदेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT