Scholarship News 2023 Saam Tv
मुंबई/पुणे

Scholarship News 2023: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 'ही' संस्था देत आहे मोठी स्कॉलरशिप

Scholarship for Class 10 Passed Students: दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! 'ही' संस्था देत आहे मोठी स्कॉलरशिप

साम टिव्ही ब्युरो

Scholarship for Class 10 Passed Students: नुकतेच दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशन (KEF), कोटक महिंद्रा ग्रुपची CSR अंमलबजावणी करणारी एजन्सी यांनी संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामधील स्कॉलरशिप प्रोग्राम लॉन्च केला आहे. यात आर्थिकदृष्ट्या वंचित घटकांमधील 11+ वर्गातील गुणवंत विद्यार्थांना अधिक पुढील शिक्षण घेण्यास मदत होण्यासाठी कोटक ज्युनियर स्कॉलरशिप प्रोग्राम सुरु करण्यात आला आहे.

या प्रोग्रामसह KEF देशाच्या भावी पिढीचे सर्वांगीण शिक्षण आणि विकासासाठी आर्थिक मदतीच्या पलिकडे जाऊ नतळागाळाच्या स्तरावर एक मजबूत आधार प्रणाली निर्माण करण्याचे ध्येय ठेवत आहे.

हा प्रोग्राम SSC, CBSE, आणि ICSE बोर्डच्या 11+ वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांच्या एका प्रारंभिक सत्रामध्ये विस्तारलेला आहे. त्यामध्ये आर्थिक मदतीच्या पलिकडे अनेक जोमदार संलग्नता गतिविधी समाविष्ट आहेत, जसे प्रत्येक विद्यार्थ्यासाठी विशेष सल्ला, करियर मार्गदर्शन सत्रे, प्रवेश परीक्षा तयारीसाठी सहाय्य एक्सपोजर व्हिजिट्स आणि होम व्हिजिट्स. (Latest Marathi News)

KEFचा स्कॉलरशिप विभाग एका दशकापेक्षा जास्त काळ विद्यार्थ्यांना आधार देत आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 3600 पेक्षा जास्त गुणवंत विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आणि आर्थिक सहाय्य पुरवले गेले आहे. 800 पेक्षा जास्त माजी विद्यार्थी यशस्वीपणे प्रतिष्ठित व्यावसायिक बनले आहेत आणि आघाडीच्या कंपन्या आणि इतर सन्माननीय संस्थांमध्ये काम करत आहेत.

याबाबत माहिती देताना कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या प्रमुख जयश्री रमेश म्हणाल्या, “कोटक एज्युकेशन फाउंडेशनमध्ये, शिक्षणाद्वारे सक्षमतेवर खोलवर केंद्रीत केलेले लक्ष हे आमच्यासाठी मागील 16 वर्षांपासून मुख्य प्राधान्य राहिले आहे. वंचित समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स उपलब्ध करून देणे हा KEF चा वारसा आणि नैपुण्य आहे. कोटक ज्युनियर स्कॉलरशिपसह, आम्ही जोमदार आणि गुणवत्तायुक्त व्यावसायिक विकसित करण्यासाठी एका मजबूत विद्यार्थी संलग्नता योजनेमध्ये पूर्णपणे केंद्रीत आहोत. ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबांना कमकुवत आर्थिक परिस्थितून येण्यास मदत होईल.”

कोटक ज्युनियर स्कॉलरशिपसाठी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत:

• SSC/CBSE/ICSE परीक्षेमध्ये 85% पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेले आहेत आणि मुंबईमधील महाविद्यालयांमध्ये 11वी वर्गासाठी प्रवेश प्राप्त केलेला आहे

• कौटुंबिक उत्पन्न वार्षिक रू.3,20,000/- इतके आहे.

• MMR (मुंबई महानगर प्रदेश) मधून आहे.

अर्ज करण्या साठी - https://kotakeducation.org/kotak-junior-scholarship/ मोनालीसाठी वय म्हणजे फक्त नंबर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून हेल्पलाइन नंबर जारी

Ganpati Visarjan : पुण्यात गणपती विसर्जनावेळी दुर्घटना, मिरवणुकीदरम्यान दोन जणांना विजेचा शॉक

Maharashtra Live News Update: प्रयागराजमध्ये गंगा आणि यमुना नदीच्या पाणी पातळीत वाढ, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT