कोपर रेल्वे उडाणपूल गणेश चतुर्थी पूर्वी प्रवाशांसाठी खुला होणार? प्रदिप भणगे
मुंबई/पुणे

कोपर रेल्वे उडाणपूल गणेश चतुर्थी पूर्वी प्रवाशांसाठी खुला होणार?

पुलाचा स्लॅब काँक्रिटने भरण्याच्या कामाचा प्रारंभ दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते झाला.

साम टिव्ही ब्युरो

डोंबिवली : डोंबिवली पूर्व-पश्चिमेला (Dombivali) जोडणारा कोपर रेल्वे उडाणपूल गणेश चतुर्थी पूर्वी खुला करण्याचा आमचा मानस आहे, अशी माहिती मंगळवारी शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी मंगळवारी दिली. पुलाचा स्लॅब काँक्रिटने भरण्याच्या कामाचा प्रारंभ दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते झाला. यावेळी त्यांनी पुलाच्या कामाची पाहणी केली. म्हात्रे यांनी कोपर पुलाचे चांगले व्हावे यासाठी जातीने लक्ष घातले आहे आणि वारंवार पाठपूरावा केला आहे.

स्लॅब काँक्रिटने भरण्याच्या कामाचा प्रारंभ वेळी म्हात्रे सोबत माजी नगरसेवक मंदार हळबे, शिवसेनेचे पदाधिकारी आशुतोष येवले उपस्थित होते.कोपर पूल धोकादायक झाल्याने रेल्वे आणि केडीएमसीने एकत्रित निर्णय घेऊन पूल वाहतुकीसाठी बंद केला. जवळपास १० कोटी रुपये खर्चुन हा पूल उभारला जात आहे. केडीएमसी व रेल्वेने निम्मा खर्च उचलला आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला असताना, हा पूल पाडून नवीन पुलाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. हा पूल वाहतुकीसाठी १५ जुलैला खुला केला जाईल असे आयुक्तांकडून सांगण्यात आले होते, मात्र तसे झाले नाही. आता पुलाच्या कामाला गती दिली असून, काम अंतिम टप्प्यात आले आहे. पुलाचा स्लॅब काँक्रिटीने भरल्यावर पुलाचे काम पूर्णत्वास येईल.त्यानंतर, तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल. दरम्यान, हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यावर ठाकुली रेल्वे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शाळांमध्ये कोणत्या पदार्थांवर बंदी, वाचा संपूर्ण लिस्ट

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेसमोर शिवसेना शिंदे गटाचं मुख्य प्रवेशद्वारासमोर आंदोलन

600 कोटी रुपयांचं घबाड, 'ब्लॅक डायमंड सिटी'त ईडीची धाड; नोटांच्या बंडलांचा ढिगारा, बघा VIDEO

Delhi Protest: आंदोलनातील जखमींवर उपचार करा, पेलेट गन वापरण्याची SOP काय? सुप्रीम कोर्ट केंद्र सरकारवर संतापले

शिंदेसेनेच्या नेत्याला सर्वात मोठा धक्का; आमदारकी रद्द होणार? सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने खळबळ

SCROLL FOR NEXT