Konkan Railway For Ganpati  
मुंबई/पुणे

Konkan Railway : अरे देवा, गणपतीक कोकणात जावचा कसा? रस्ते खड्डेबंबाळ अन् रेल्वे बुकिंगही ५ मिनिटांत फुल!

Konkan Railway For Ganpati :दरवर्षी गणेशोत्सवासाठी कोकणवासीय आपल्या गावी जात असतात. त्यामुळे सरकारने विशेष रेल्वे गाड्या सोडणार असल्याची घोषणा केली. परंतु नागरिकांना तिकीटच मिळत नसल्यानं प्रवाशी वैतागले आहेत.

Bharat Jadhav

कोकणात गणेशोत्सवाला जाणाऱ्यांची मोठी संख्या असते. ही बाब लक्षात घेऊन विशेष गाड्या कोकणात सोडल्या जाणार असल्याची घोषणा सरकारकडून करण्यात आली खरी पण नागरिकांना मात्र तिकीटच मिळत नाहीये. तिकीट बुकिंग करण्यासाठी गेलेल्यांना नागरिकांना तिकीट ने घेता खाली हातच परत यावं लागत आहे. मात्र अवघ्या पाच मिनिटात गाड्या कशा फुल होतात, असा संतप्त सवाल प्रवाशी करत आहेत.

कोकणात गणेशोत्सवासाठी जाण्याकरता रेल्वे तिकिटांची बुकिंग सुरू झालीय. मात्र काही मिनिटात रेल्वे तिकीट बुकिंग फुल होत आहेत. त्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. इतक्या जलदगतीने तिकीट बुकिंग फूल होते तरी कशी? यात काही काळाबाजार होत आहे का?असा सवाल नागरीक करत आहेत. आता तिकिट बुकिंग सुरू झाली तितक्यात दोन दिवसात कसं फुल होतं.

यामागे काही काळाबाजार आहे का? रेल्वे कर्मचारी लगेच कसं तिकीट बुकिंग फूल झाल्याचं म्हणून शकतात? तिकीट बुकिंगसाठी रांगेत उभे राहूनही तिकीट मिळत नाहीये, मग रेल्वे सेवांचा उपयोग काय? गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी खासगी कार किंवा बसने जाण्याचा विचार केला तर रस्त्यांची स्थिती खराब आहे. मग कोकणात जायचं कसं असा सवाल रेल्वे प्रवाशी श्रृती श्रुंगे यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday horoscope: रखडलेलं काम होईल, वायफळ खर्च करू नका; वाचा तुमचं आजचं राशीभविष्य

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

SCROLL FOR NEXT