कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाकरिता पुणे विभागाच्या ११८ जादा लालपरी  Saam Tv
मुंबई/पुणे

कोकणवासियांसाठी खुशखबर! गणेशोत्सवाकरिता पुणे विभागाच्या ११८ जादा लालपरी

सर्वाधिक लालपरी कोकणात धावणार

सागर आव्हाड साम टीव्ही पुणे

पुणे : गणेशोत्सवकरिता राज्य परिवहन महामंडळ पुणे विभागाच्या ११८ अतिरिक्त लालपरी धावणार आहेत. यामध्ये सर्वधिक गाड्या कोकणात जाणार आहेत. आतापर्यंत जवळपास ६० गाड्यांचे आरक्षण फुल्ल झालेले आहेत. येणाऱ्या काही दिवसात आणखी काही गाड्यांचे आरक्षण होणार आहे, असा अंदाज एसटी प्रशासनाला आहे.

हे देखील पहा-

उर्वरित गाड्या पुणे- मुंबई, पुणे- कोल्हापूर, पुणे- सातारा या मार्गावर सोडण्यात येणार आहे. कोकणकरिता ८ सप्टेंबर पासून अतिरिक्त लालपऱ्या सुटणार आहे. मागील वर्षी गणेशोत्सवर कोरोनाचे सावट होते. यामुळे लालपरी प्रवासासह अन्य बाबीवर निर्बंध होते. यंदाच्या वर्षी देखील मात्र, दुसरी लाट ओसरली आहे. त्यामुळे लालपरी प्रशासनाने कोकणात जाणाऱ्या भाविकांकरिता अतिरिक्त लालपऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे.

मुंबई, पुणे सह अन्य विभागातून गणेशोत्सवकरिता अतिरिक्त गाड्या सोडण्याचे नियोजन लालपरी प्रशासनाने केले आहे. यामध्ये पुणे विभागाचा देखील समावेश आहे. सर्वधिक लालपरी कोकणातील रत्नागिरी, चिपळूण, सिंधुदुर्ग, लांजा, आदी मार्गावर सोडण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

By-Election Results: बिहारनंतर भाजपनं जम्मू-काश्मीरमध्ये उधळला गुलाल; CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का, जाणून घ्या सर्व ८ पोटनिवडणुकांचे निकाल

DRIची मोठी कारवाई; मुंबई विमानतळावर १७.१८ कोटींचं कोकेन जप्त, टांझानियाच्या महिलेला अटक

Bihar Election Result Live Updates : बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक - राहुल गांधी

Fact Check : 7 तारखेला पगार न मिळाल्यास बॉसला जेल? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय? जाणून घ्या

Bihar Politics : बिहारमध्ये काँग्रेसचं पानिपत; कोणत्या चुका ठरल्या पराभवाचं कारण?

SCROLL FOR NEXT