Hapus Mango In Mumbai
Hapus Mango In Mumbai Saam TV
मुंबई/पुणे

Hapus Mango : कोकणाचो हापूस इलो रे! मुंबईत हापूस आंब्याची पहिली पेटी दाखल, वाचा दर किती?

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : हापूस प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. 'कोकणचा राजा' समजल्या जाणाऱ्या रत्नागिरी हापूस आंब्याची पहिली पेटी मुंबईत (Mumbai) दाखल झाली आहे. मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही पेटी दाखल झाली आहे. फळ व्यापारी विजय ढोले यांच्या निवृत्ती नानाजी ढोले अँड सन्समध्ये यंदाच्या हंगामातील पहिल्या आंब्याच्या दोन पेट्या दाखल झाल्या आहेत. (Latest Marathi News)

देवगड तालुक्यातील पुरळ कोठड गावातील शेतकरी वसंत गावकर यांच्या शेतातील हा आंबा आहे. गावकर यांच्या आंबा बागेतील झाडाला पावसाळ्यातच मोहर आला होता. याची त्यांनी चांगली काळजी घेतली. यामुळे थंडीतच झाडाला आंबा आला आहे. त्यांच्या हा आंबा पेटीला चांगली बोली लागणार आहे. हंगामातील ही पहिली पेटी हजारोंच्या किंमतीत विकली जाणार आहे.

मागील दोन ते तीन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फळांचा राजा आंबा हा म्हणावं तितकं बाजारात आला नसल्याने नागरिकांना एकतर कमी प्रमाणात आणि जास्त दर घेऊन आंबा खरेदी करावा लागला. पण यंदा हंगामाच्या आधीच आंबा हा बाजारात दाखल झाला आहे. यंदा अपेक्षेप्रमाणे जास्तच आंब्याची आवक होणार आहे आणि यंदा मोठ्या प्रमाणात आंब्याला मागणी आहे, अशी माहिती यावेळी फळ व्यापारी विजय ढोले यांनी दिली.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rakul Singh : असं रूपडं देखणं त्याला सूर्याचं रे दान

Home Remedies: उष्णता वाढल्याने जिभेला फोड आले आहेत? हे घरगुती उपाय ठरतील फायदेशीर

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेच २०२९ पर्यंत मुख्यमंत्री राहतील; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा मोठा दावा

Love Marriage Tips : लव्ह मॅरेज करताय? सासूबाईंना इंप्रेस करण्यासाठी खास टीप्स

Airtel Data Plans: 'हे' आहेत एअरटेलचे ५ स्वस्त डेटा रिचार्ज प्लान! पहा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT