Who Is Mihir Shah Saam Tv
मुंबई/पुणे

Who Is Mihir Shah: वरळी हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा कोण आहे? BMW ने महिलेला उडवलं, अद्यापही आहे फरार

Worli Hit And Run Case: वरळीतही हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा हा अद्यापही फरार आहे. तो नेमका कोण आहे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या...

साम टिव्ही ब्युरो

पुण्यानंतर मुंबईमधील वरळीतही हिट अँड रनची घटना घडल्याचं समोर आलं आहे. येथे बीएमडब्ल्यू कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. वरळी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४५ वर्षीय कावेरी नाखवा या पती प्रदीप नाखवासोबत ॲनी बेझंट रोडवरून जात असताना पहाटे साडेपाचच्या सुमारास बीएमडब्ल्यूच्या चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले त्याने दुचाकीला धडक दिली.

या धडकेमुळे कावेरी रस्त्यावर पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. या अपघातात त्यांचे पतीही जखमी झाले, मात्र त्यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा हा गाडी चालवत होता. याप्रकरणी पोलिसांनी राजेश शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत यांना अटक केली आहे. मात्र आरोपी मिहीर शहा हा फरार आहे.

कोण आहे मिहीर शहा?

मिहीर शाह 23 वर्षांचा आहे. तो शिंदे गटाचे नेते राजेश शहा यांचा मुलगा आहे. घटनेच्या वेळी मिहीर शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत हे दोघे बीएमडब्ल्यू कारमधून प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी मिहीरच कार चालवत होता, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.

मात्र, सध्या तो फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आतापर्यंतच्या तपासात असे समोर आले आहे की, मिहीर शहा आणि राजेंद्रसिंह बिडावत मरीन ड्राईव्हवर लाँग ड्राईव्हला जाऊन परतत होते. घटनेच्या वेळी चालक दारूच्या नशेत होता का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांनी याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. आरोपीच्या वैद्यकीय चाचणी आणि रक्ताच्या नमुन्यानंतरच उत्तर मिळू शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Care Tips: हे करून पाहा.. मग तुमच्या गाडीचा रंग केव्हाही उडणार नाही

Maharashtra News Live Update: शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज कल्याण कोर्टात हजर करणार

Petrol-Diesel Price: भारतात पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठा बदल, तुमच्या शहरातील आजचे दर किती?

EPFO Pension Update: फक्त 10 वर्षे नोकरी केली तरी मिळेल महिन्याला पेन्शन? जाणून घ्या संपूर्ण हिशोब

Nashik News: अल्पवयीन विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, आश्रम शाळेतील धक्कादायक प्रकार; नाशिकमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT