Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

किरीट सोमय्या उद्या राणा दाम्पत्याची भेटून माफी मागणार, कारण...

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवरती टीका केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई: राणा दांम्पत्याला आज जामीन मंजूर झाला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या उद्या खार येथील घरी राणा दाम्पत्याच्या भेटीला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. महाराष्ट्राच्या जनतेच्यावतीने त्यांची माफी मागणार. हनुमान चालीसा म्हणण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या माफिया सरकारने त्यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा लावला. याबद्दल राणा दाम्पत्याची क्षमा मागणार असे किरीट म्हणाले आहेत.

किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि राज्य सरकारवरती टीका केली आहे. आज NIA ने उच्च न्यायालयात मनसुख हिरेन हत्या प्रकरणाचे आरोपपत्र सादर केले. त्यात एनआयएने माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना प्रमुख आरोपी घोषित केले आहे. त्यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की सचिन वाझेंकडून100 कोटींची वसुली ही ठाकरे सरकारची योजना होती.

मनसुख हिरेनची हत्या ठाकरे सरकारमुळे झाली आहे. आज NIA नी कोर्टात चार्जशीट दाखल केली. प्रदीप शर्मा हे उद्धव ठाकरे यांचे 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीचे उमेदवार, आणि सचिन वाझे शिवसेनेचे प्रवक्ते होते. या दोघांना गैरकायदेशीररित्या उद्धव ठाकरे यांनी पुनर्नियुक्त केले. या दोघांना हे करण्यास कोणी प्रवृत्त केले याचाही तपास झाला पाहिजे. प्रदीप शर्मा आणि सचिन वाझे ची नियुक्ती झाली नसती तर सुपारी घेऊन मनसुख हिरेनची हत्या झाली नसती. याची जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यायची गरज असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

IND vs ENG 2nd Test Score: शुबमनकडून इंग्लंडच्या गोलंदाजांची धुलाई; दुसऱ्या डावातही ठोकलं शतक

SCROLL FOR NEXT