Kirit Somaiya Saam TV
मुंबई/पुणे

सहा आमदारांची नावे फोडणे हा आचारसंहितेचा भंग; सोमय्यांचा राऊतांवर गंभीर आरोप

निवडणूक आयोगाने याबद्दल योग्य कारवाई करून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे 3 तर भाजपचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. यावेळी भाजपाचे धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे संजय पावर यांच्यातील लढत प्रतिष्ठेची समजली जात होती. या निवडणुकीत संजय पवार यांचा पराभव झाला. या पराभवानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी काही आमदारांची नावे घेत या नेत्यांनी आम्हाला मते दिली नाही, असा गंभीर आरोप केला.

संजय राऊतांनी सहा आमदारांची नावं घेतली. यावर आता भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी आक्षेप घेतला आहे. संजय राऊतांनी निवडणुकीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे असा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. तसेच निवडणूक आयोगाने याबद्दल योग्य कारवाई करून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

राऊतांना शिवसेनेला मत न दिलेल्या ६ आमदारांची नावे कशी कळाली? असा थेट सवाल देखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला. तुम्ही सहा आमदारांची नावे कशी आणि का घेतली? त्याला आधार काय? से सवालही सोमय्या यांनी उपस्थित केले आहेत. संजय राऊत 6 आमदारांची नावे घोषीत केली. असे करुन त्यांनी निवडणूक आयोगाचा भंग केला आहे.याची निवडणूक आयोगानं चौकशी करावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

तसेच पुढे किरीट सोमय्या म्हणाले की, काही छोटे पक्ष आहेत जे आपले उमेदवार उभे करू शकत नाहीत पण ते कुणालाही मतदान करू शकतात, मात्र त्यांनी कुणाला मतदान केलं हे तुम्हाला कसं कळालं, किंवा निवडणूक आयोगाला तरी कसं कळालं? याचं उत्तर संजय राऊत यांना द्यावा लागणार आहे. याचा अर्थ शिवसेनेने आचारसंहितेचा आणि गोपनियतेचा भंग केला आहे." असे आरोप सोमय्यांनी केले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या आरोपानंतर आता आयोग काय कारवाई करणार हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT