Kirit Somaiya letter to Devendra Fadnavis demanding action in alleged video case  Saam TV
मुंबई/पुणे

Kirit Somaiya Viral Video: कथित व्हिडीओ प्रकरणी किरीट सोमय्यांचं ट्वीट; देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहत केली चौकशीची मागणी

Kirit Somaiya Letter To Fadnavis: भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.

साम टिव्ही ब्युरो

Kirit Somaiya Latest News: भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. याबाबत एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त देखील प्रसारीत केलं आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी आता संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, व्हिडीओ प्रसारित होताच किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहलं आहे.

या पत्रात किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी कथित व्हिडिओ प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे. मी कोणत्याही महिलेवर अत्याचार केलेला नाही. त्यामुळे या सगळ्यांची चौकशी करून सत्यता तपासावी आणि चौकशी करावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी आपल्या पत्राद्वारे देवेंद्र फडणवीसांकडे (Devendra Fadnavis) केली आहे.

सोमय्या यांचं फडणवीसांना पत्र जशाच तसं

प्रति,

मा. श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. देवेंद्रजी

आज सायंकाळी एका मराठी वृत्तवाहिनीवर माझी एक व्हिडिओ क्लिप प्रदर्शित करण्यात आली, या निमित्ताने अनेक व्यक्तींनी माझ्यावर अनेक आरोप केले, आक्षेप घेतले आहेत.

अशाप्रकारच्या अनेक व्हिडिओ क्लिप्स उपलब्ध आहेत, असेही सांगण्यात आले आहे, येत आहे. मी अनेक महिलांवर अत्याचार केले, अनेक महिलांच्या तक्रारी आल्या आहेत आणि त्याच्या अनेक व्हिडिओ क्लिप आहेत, असेही दावे केले जात आहेत. तथापि माझ्याकडून कोणत्याही महिलेवर अशा अत्याचार.... झालेला नाही, हे मी याठिकाणी स्पष्ट करतो. त्यामुळे अशा सर्व आरोपांची आपण चौकशी करावी, अशी माझी आपणास विनंती आहे. ही व्हिडिओ क्लिप किवा अन्य अशा व्हिडिओ क्लिप (जर कोणाकडे असल्यास किंवा प्रदर्शित झाल्यास) या सगळ्यांची सत्यता तपासावी आणि त्याची चौकशीही करावी, अशी मी आपणास विनंती करीत आहे. कळावे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Govindwadi Bypass Bridge : ६ वर्षांतच पुलाची दैना; कल्याणच्या गोविंदवाडी बायपास पुलाच्या कोट्यवधींच्या कामावर प्रश्नचिन्ह

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस गळण्याची समस्या? 'या' टिप्सने घ्या केसांची योग्य काळजी

मराठमोळ्या ठसक्यात तरुणीचा जोरदार डान्स; 'चाळ माझ्या पायांत' गाण्यावर दिला धमाकेदार परफॉर्मन्स

Maharashtra Live News Update: कल्याणच्या गोविंदवाडी बायपासवरील पुलाची सहा वर्षांत दुरवस्था

Pink Saree: नवविवाहीत स्त्रीयांनी श्रावणात सणासुदींसाठी नेसा 'ही' सुंदर गुलाबी साडी

SCROLL FOR NEXT