बारावीच्या विद्यार्थ्याने केले स्वतःचेच अपहरण! अन पुढे असे काही घडले... SaamTV
मुंबई/पुणे

धक्कादायक : ड्रग्जसाठी पैसे नाहीत म्हणून केले अल्पवयीन मुलाचे अपहरण

तपासात पोलिसांना कळाले की मुलगा ज्या इमारतीत राहत होता. त्या बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर राहणारा शिव शंकर हा त्याच दिवसापासून बेपत्ता होता.

सुरज सावंत

मुंबई : नशेसाठी पैसे नसल्याने एका अल्पवयीन मुलाचे अपहरण (Abduction of a Minor) करून त्याची विक्री करण्यासाठी निघालेल्या माथेफिरू आरोपीस दिल्ली व मुंबईच्या संयुक्त कारवाई दरम्यान पोलिसांनी माहिम परिरातून अटक केली आहे. मुंबई पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, 25 नोव्हेंबर रोजी एका महिलेने दिल्ली मानसरोवर पोलीस ठाण्यात आपले 10 वर्षाचे मूल बेपत्ता झाल्याची तक्रार केली होती, गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला.

हे देखील पहा -

पोलिसांच्या तपासात पोलिसांना कळाले की मुलगा ज्या इमारतीत राहत होता. त्या बिल्डिंगच्या तिसर्‍या मजल्यावर राहणारा शिव शंकर हा त्याच दिवसापासून बेपत्ता होता, पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याला अंमली पदार्थांचे व्यसन असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याला फोन केला असता त्याने पठाण कोटला काही कामासाठी आला असल्याचे सांगत फोन कट केला. मोबाईल बंद केला, पोलिसांनी मोबाईलचे लोकेशन (Mobile location) काढले तेव्हा त्याने धारावी परिसरात दाखवले.

दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) टीमने तात्काळ मुंबई पोलिसांशी (Mumbai Police) संपर्क साधला, मुंबई पोलिसांनी धारावी परिसरात काम करणाऱ्या एनजीओची मदत घेतली, तेव्हाच त्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, 4 वर्षांपूर्वी आरोपी धारावीत राहत होता, आणि दोन-तीन दिवसांपूर्वीच तो आला होता. सोबत एका लहान मुलही असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी रविवारी पहाटे साडेचार वाजता माहीम रेल्वे स्थानकावरून आरोपीला पकडले आणि मुलाचीही सुटका केली.

पोलिस चौकशीत आरोपीने सांगितले की, त्याच्याकडे ड्रग्ज करण्यासाठी पैसे नव्हते, आणि हे मूल विकून पैसे मिळाले असते, याआधीच आरोपी मूल विकण्यासाठी ग्राहक शोधत होता, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Edited By - Jagdish patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

RTI Informationच्या माध्यमातून पत्नी नवऱ्याचा पगार जाणून घेऊ शकते का? कोर्टानं काय दिला निर्णय

Tuesday Horoscope : आयुष्यात वादळ येणार; ५ राशींच्या लोकांच्या हातातून धनसंपत्ती निसटणार

Maharashtra Live News Update: मिरा-भाईंदर: पोलीस भरतीदरम्यान घेतलं 'ड्रग्ज'चे इंजेक्शन, बारामतीच्या उमेदवाराला अटक

Tuesday Horoscope: प्रेम, करिअर आणि पैसा कमवण्यासाठी नवीन संधी मिळेल, ताण कमी होईल; वाचा राशीभविष्य

Weight Loss Poha: वजन कमी कारायचं आहे आणि चटपटीत पण हवयं? मग सकाळी नाश्त्याला खा 'हे' हेल्दी पोहो

SCROLL FOR NEXT