Lonavala Police Station दिलीप कांबळे
मुंबई/पुणे

Crime News: अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून सुटका

सदरची माहिती ओरिसा येथील संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात आले असून पुढील तपास लोनावल पोलीस करीत आहे.

दिलीप कांबळे

मावळ - ओरिसा राज्यातून अपहरण करून आणलेल्या एका सतरा वर्षीय पीडित मुलीची मावळ मधील नवलाख उंबरे येथून सुटका करण्याची कौतुकास्पद कामगिरी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केली आहे. लोणावळा (Lonavala) ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ओरीसा मधील सिमुलीया पोलीस ठाणे येथून अपहरण झालेली 17 वर्षीय पीडित मुलगी मावळ मधील तळेगांव दाभाडे पोलीस (Police) ठाण्याच्या हद्दीत नवलाख उंबरे येथे एका खोलीत डांबून ठेवलं असल्याची माहिती मिळाली.

हे देखील पहा -

लगेच लोणावळा पोलिसांनी सर्व प्रथम मोबाईल टॉवर लोकशेनच्या आधारावर नवलाख उंबरे येथे पोहचून तेथील स्थानिकांच्या मदतीने पिडीत मुलीचा शोध घेऊन एका बंद खोलीतून तिला सुखरूप ताब्यात घेतले. लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पिडीत मुलीला बाल कल्याण समिती यांच्या समक्ष हजर करून सध्या तिला चैतन्य महिला आश्रम, मोशी याठिकाणी सुखरूप ठेवण्यात आले आहे. सदरची माहिती ओरिसा येथील संबंधित पोलीस ठाण्यात कळविण्यात आले असून पुढील तपास लोनावल पोलीस करीत आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT