crime saam tv
मुंबई/पुणे

Crime News: घरगुती भांडणातून चिमुकलीची हत्या; जवानास अटक

या घटनेचा तपास खारघर पोलिस करीत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- सिद्धेश म्हात्रे

नवी मुंबई : घरगुती भांडणात (fighting) झालेल्या मारहाणीत तीन वर्षीय मुलीचा (girl) नाहक बळी गेला. रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाने घरगुती भांडणातून पत्नी व मुलीला केलेल्या मारहाणीत मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (kharghar latest marathi news)

तळोजा येथील तलावाजवळ असणाऱ्या डेम्ब्रिजमध्ये पाेलिसांना मुलीचा मृतदेह आढळून आला होता. खारघर (kharghar) पोलिसांनी मुलीच्या फोटोवरुन तिच्या नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी पाेलिसांनी संबंधित मुलगी पापडी पाडा गावातील रॅपिड ऍक्शन फोर्सच्या जवानाची असल्याचे समजले. पोलिस जवानाच्या घरी गेले असता जवानाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.

पाेलिसांनी (khargar police) दिलेल्या माहितीनूसार परशुराम तिपन्ना याने घरगुती भांडणा दरम्यान मुलीला भिंतीवर आपटल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे पहाटेच्या सुमारास मुलीचा मृतदेह तळोजा तलावाशेजारी (taloja lake) असणाऱ्या डेब्रिजच्या भरावामध्ये पुरण्याचा प्रयत्न केल्याची कबुली तिपन्ना याने दिली आहे. तिपन्नावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खारघर पोलिस करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Garba Jhumka Designs : नवरात्रीत घाला 'हे' ८ ट्रेंडी डिझाइनचे झुमके, गरबा लूक दिसेल एकदम हटके

Kidney Health: राजमा खाल्ल्याने किडनी खरोखरच दुरुस्त होते का? 'हा' धक्कादायक खुलासा वाचून चकित व्हाल

Amla juice: सकाळी रिकाम्या पोटी प्या एक ग्लास आवळ्याचा रस; मिळतील हे 4 फायदे

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

SCROLL FOR NEXT