kalyan , Khadakpada police, police, mumbai , thane saam tv
मुंबई/पुणे

Kalyan News : मुंबई, ठाण्यातून गाड्या चाेरी करणारी टाेळी जेरबंद

आंबिवली इराणी वस्तीत राहणार अट्टल गुन्हेगार अब्दुल इराणी याचा पाेलिस शाेध घेताहेत.

प्रदीप भणगे

Kalyan : खडकपाडा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचा-यांनी दाेन सराईत गुन्हेगारांना जेरबंद केले आहे. या संशयित आराेपींकडून जबरी चोरी व मोटारसायकल चोरीचे एकूण १८ गुन्हे उघडकीस आणण्यात पाेलिसांना (police) यश आलं आहे. मुंबई (mumbai), ठाणे परिसरात या संशयितांनी चो-या केल्या हाेत्या. पोलिसांनी ११ मोटारसायकल व १५ ग्रॅम सोन्याचा ऐवज संशयितांकडून हस्तगत केला आहे.

आंबिवली स्टेशन जवळ एका महिलेला दोन चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवत तिच्या गळ्यातील साेन्याची साखळी खेचून फरार झाले होते. याबाबत कल्याणच्या खडकपाडा पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार नाेंदवली हाेती. या घटनेचा तपास पोलिस करीत हाेते. खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, एपीआय अनिल गायकवाड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद झिने आणि टीमने मोहने येथून दोन संशयित आरोपींना अटक केली. तसेच एक संशयिताचा शाेध सुरु ठेवला.

या प्रकरणी पाेलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सुनील उर्फ सोन्या शंकर फुलारे (वय 20), गणेश नवनाथ जाधव (वय 26) यांचा समावेश आहे. या प्रकरणात आंबिवली इराणी वस्तीत राहणार अट्टल गुन्हेगार अब्दुल इराणी याचा पाेलिस शाेध घेताहेत.

दरम्यान संबंधित संशयित आरोपींकडे पोलीस कोठडी दरम्यान अधिक तपास केला असता त्यांनी ठाणे जिल्हयात ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच मुंबई, नवी मुंबई अशा विविध शहरांमध्ये मोटारसायकल चोरी व जबरी चोरीचे गुन्हे केल्याचे उघड झाले आहे.

कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ म्हणाले खडकपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोटारसायकल चोरीच्या व सोनसाखळी चोरीच्या घटनांची नोंद झालेली होती. यात तपास करताना खडकपाडा पोलीसांनी मोहने येथून दोघांना अटक केली आहे. मुंबईतील चुनाभट्टी येथील एक व्हिडिओ पोलिसांना मिळाला आहे.

सुनील व त्याचा मित्र अब्दुल यांना पोलीस पकडण्याचा प्रयत्न करीत असताना संशयित आरोपींची गाडी स्लिप झाली. मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना धक्काबुक्की करत ते पळून गेले होते. सोन्या उर्फ सुनील फुलारे याला अटक करण्यात आली आहे. अब्दुल हा अद्याप फरार आहे. मोटारसायकल चोरी करणारा गणेश जाधव याला देखील पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपींकडून नऊ लाख साठ हजार किमतीच्या एकूण ११ चोरीच्या मोटारसायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच साठ हजार किंमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची मण्यांची माळ असा एकूण दहा लाख वीस हजार रुपयांच्या किंमतीचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे असेही गुंजाळ यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : मैद्याचे पदार्थ ३० दिवस खायचे बंद करा, तुमच्या शरीरावर होईल 'हा' परिणाम

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

SCROLL FOR NEXT