Shivsena SaamTV
मुंबई/पुणे

केडीएमसी मधील नवीन प्रभाग रचनेचा शिवसेनेला फायदा?

122 वरुन 133 प्रभाग झाले असून यावेळेला प्रभाग रचना बदलल्याने याचा फायदा शिवसेनेला जास्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

प्रदीप भणगे

डोंबिवली - कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमच पॅनल पद्धतीने निवडणूक (Election) होणार आहे. 122 वरुन 133 प्रभाग झाले असून यावेळेला प्रभाग रचना बदलल्याने याचा फायदा शिवसेनेला (Shivsena) जास्त होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. तर नवइच्छुकांचा हिरमोड झाला आहे. दरम्यान येत्या निवडणुकीत जर शिवसेना महाविकास आघाडीला घेऊन चालली तर याचा फायदा शिवसेनेसह राष्ट्रवादीला (NCP) होईल. तर महाविकास आघाडीमुळे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपाला (BJP) मोठा फटका पडण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे पॅनल पद्धत झाल्याने मनसेला फटका पडू शकतो असे बोलले जात असेल तरी मात्र तत्कालीन सत्ताधारी शिवसेना आणि भाजपाची कामे पहाता आणि नागरिकांमधील रोष पहाता मनसेला पुन्हा एकदा चांगल्या प्रमाणात मतदान होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. मात्र हे मतदान नगरसेवक निवडून आणण्यामध्ये मनसेला कितपत यश येते हे पहावे लागेल. 

हे देखील पहा -

कल्याण पश्चिममध्ये शिवसेनेची ताकद ही पहिल्यापासून आहे आणि महापालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्यामध्ये कल्याण पश्चिमेतील नगरसेवकांचा मोठा वाटा आहे. मागच्या टर्मला भाजपची हवा होती त्यामुळे कल्याण पश्चिमेत भाजपचे काही नगरसेवक निवडून आले. मात्र आता परिस्थिती उलटी झाली आहे. भाजपच्या याच नगरसेवकांना नविन पॅनल पद्धतीमुळे फटका पडू शकतो. कल्याण पूर्वेमध्ये भाजपा आमदार गणपत गायकवाड हे असले तरी स्थानिक लेव्हलला शिवसेनेची ताकद आहे. त्यामुळे पॅनल पद्धतीचा फायदा शिवसेनेला कल्याण पूर्वेत होणार आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात खरी चुरस होणार ती कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात. भौगोलिक दृष्ट्या हा विधानसभा क्षेत्र मोठा आहे. त्याचप्रमाणे मोठमोठाले नेते ग्रामीण परिसरात आहेत. तसेच गेल्या वर्षभरापासून आपण पाहीले तर खासदार श्रीकांत शिंदे आणि मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यात विकासकामांवरुन शीतयुद्ध सुरु असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान पॅनल पडल्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात मनसे शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांना बऱ्यापैकी फायदा होईल,तर भाजपाला तोटा होईल असे बोलले जात आहे.

डोंबिवली विधानसभा क्षेत्रात मोठी उलथापालथ या पॅनल पद्धतीने होणार आहे. शिवसेनेची ताकद यामुळे डोंबिवलीत वाढली तर वावगे ठरु नये, तर काही प्रमाणात नागरिकांचा सत्ताधाऱ्यांवर रोष पहाता मनसेला सुद्धा थोड्या प्रमाणात यश येऊ शकते. तर प्रभाग रचना बदलल्याने याचा फटका भाजपाला पडेल अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT