Chandrakant Patil News
Chandrakant Patil News  Saam Tv
मुंबई/पुणे

Kasba Election: बालेकिल्ल्यात भाजपचा दारुण पराभव! पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले; 'पुन्हा कमळ...'

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Ksba Byelection Result: भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या कसबा मतदार संघ भाजपच्या हातून निसटला आहे. कसब्यातून कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. या मतदार संघात 28 वर्षांनी भाजपचा मोठा पराभव झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून संपूर्ण भाजपा नेते कसब्यामध्ये ठाण मांडून बसले होते.

स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यामुळेही ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली होती. मात्र रविंद्र धंगेकरांनी भाजपला या ठिकाणी मोठा धक्का दिला. या निकालानंतर पहिल्यांदाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले चंद्रकांत पाटील...

"कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील‌ जनतेचा कौल आम्ही नम्रपणे स्विकारतो. लोकशाहीत जनमताचा निर्णय सर्वोच्च आहे. कसब्याच्या विकासासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध आहोत. या निवडणुकीत सर्वस्व झोकून काम करणाऱ्या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार, नव्याने उभे राहू, पुन्हा कमळ फुलवू!" असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

अजित पवारांनी केली टीका...

तर दुसरीकडे कसब्यातील ऐतिहासिक विजयानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. "हा महाविकास आघाडीच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगत विजयी उमेदवार रविंद्र धंगेकर यांचे अभिनंदन केले आहे. तसेच याबद्दल पुढे बोलताना त्यांनी ज्या प्रकारे शिंदे- फडणवीस सरकार सत्तेत आले आहे. ते जनतेला आवडले नसून शिंदे फडणवीस सरकार जनतेला अमान्य असल्याची" टीका त्यांनी केली आहे.

चिंचवडचा गड 'भाजप'कडे...

दरम्यान, एकीकडे कसबा मतदार संघात ऐतिहासिक विजय मिळवला असतानाच चिंचवडमध्ये मात्र अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. चिंचवडमध्ये भाजपाच्या अश्विनी जगताप विजयी झाल्या असून त्यांनी नाना काटेंचा ३६ हजार ९१ मतांनी पराभव केला. दरम्यान, चिंचवडमध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्या बंडखोरीचा फटका महाविकास आघाडीला बसल्याचे दिसत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit Pawar News | बारामतीच्या प्रचारातील व्हिडीओ व्हायरल, प्रचाराचे पैसे न दिल्याचा आरोप

Poha Idli : सकाळी नाश्त्यात बनवा पोहा इडली; जाणून घ्या रेसिपी

Today's Marathi News Live : महायुतीचा पालघरमधील तिढा सुटला

Special Report : निवडणूक आयोगाच्या सुधारित टक्केवारीवरून वाद, आयोगावर नेमका कुणाचा दबाव?

Rohit Pawar News | बारामती सहकारी बॅंकेतून 500च्या नोटा गायब, रोहित पवारांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT