Viral Video Saam Tv
मुंबई/पुणे

Viral Video : 'जो पत्ता करतो गुल...', रविंद्र धंगेकरांच्या विजयी मिरवणुकीत परदेशी तरुणीचा बेभान डान्स

परदेशी महिलेनं भन्नाट डान्स करत सर्वांचच मन जिंकलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

Pune Kasaba Bypoll Election Result 2023 : कसबा पोटनिवडणुकीनंतर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कसब्यात रविंद्र धंगेकर यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयोत्सव साजरा केला. धंगेकर यांच्या विजयी मिरवणुकीतील एका परदेशी महिलेचा डान्स व्हायरल होत आहे.

रविंद्र धगेंकर यांच्या विजयामुळे त्यांचे कार्यकर्ते खूश आहेत. मात्र त्यांच्या मिळवणुकीत नाचणाऱ्या परदेशी महिलेला पाहून ही एवढी खूश का असाच प्रश्न अनेकांना पडला. या विजयी रॅलीत ही महिला बेधूंद होऊन नाचताना दिसली. महिलेबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या महिलेनं भन्नाट डान्स करत सर्वांचच मन जिंकलं आहे. (Latest News)

डोक्यावर टोपी, आकाशी रंगाचं शर्ट, लांब स्कर्ट आणि हातात भगवं उपरण घेऊन ही महिला थिरकताना दिसत आहे. 'जो पत्ता करतो गुल पॉवरफुल...' या डीजे गाण्यावर ही महिला बेभान नाचताना दिसली.

रविंद्र धंगेकरांचा 11 हजार मतांनी विजय

कसबा मतदारसंघात रवींद्र धंगेकर यांना ७३,१९४, तर भाजपचे हेमंत रासने यांना ६२,२२४ मते मिळाली. रवींद्र धंगेकर 11,040 मतांनी विजयी झाले आहेत. कसबा भाजपचा गड मानला जातो. तब्बल 28 वर्षांनंतर या ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weekly Horoscope: 'या' राशींनी महत्त्वाचे निर्णय घाईत घेणं टाळावं; साप्ताहिक राशीभविष्य

Maharashtra Live News Update : ऐन दिवाळीत पावसाची शक्यता

VIDEO : हाँगकाँगमध्ये मोठी दुर्घटना! लँडिंगवेळी कंट्रोल सुटलं, कार्गो विमान थेट समुद्रात कोसळलं, दोघांचा मृत्यू

दिवाळी गोड! मोदी सरकारकडून महाराष्ट्राला 1 हजार 566 कोटींचा निधी|VIDEO

PMC Bonus: पुणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार! सातव्या वेतन आयोगाच्या फरकासह बोनस जाहीर

SCROLL FOR NEXT