Devendra Fadnavis attack on opponents  saam tv
मुंबई/पुणे

Kasba Bypoll Election : सत्ता आमच्या डोक्यात जात नाही! देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल

Kasba Bypoll Election : कसब्याचा आमदार कोणता हवा असं म्हणत हेमंत रासनेंना विजयी करण्याचे आवाहन फडणवीस यांनी केले.

Chandrakant Jagtap

Kasba Bypoll Election : देवेंद्र फडणवीस यांनी आज कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्या विजयासाठी रॅली काढली. यावेळी रॅलीला संबोधित करताना फडणवीसांनी केंद्रात भाजप, राज्यात भाजप; मग कसब्याचा आमदार कोणता हवा असं म्हणत हेमंत रासणेंना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी फडणवीस यांनी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, काय दुटप्पी लोक आहे, निर्णय त्यांचा काळात झाला, तेव्हा त्यांनी आंदोलनाला प्रतिसाद दिला नाही. एमपीएससीचा प्रश्न आम्ही सोडवला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सत्ता आमच्या डोक्यात जात नाही. यांचं सरकार असतं तेव्हा ते तोंड उघडत नाहीत आणि आमचं सरकार आलं की जणू काही यांनीच केलं असं दाखवतात. पण 'ये पब्लिक है सब जानती है' असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. (Latest Political News)

देवेंद्र फडणवीस म्हणाले परिवर्तन घडवायचंय त्यामुळे हेमंत रासने यांनाच विजयी करा. केंद्रात भाजप युती सरकार आहे, राज्यात भाजप युती सरकार आहे. मग कसब्यात उमेदवार कसा हवा, तो भाजप समर्थक हवा. नरेंद्र भाई आगे बढो म्हटलं तर कसबा उमेदवाराने काय म्हटलं पाहिजे? असे म्हणत रासने यांनाच विजयी करण्याचं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर वाहतूक कोंडी

Ind vs Aus : विराट कोहली-रोहित शर्माचं कमबॅक लांबणीवर? ऑस्ट्रेलियाच्या पर्थमधून आली सर्वात धक्कादायक अपडेट

Pneumonia Symptoms: न्यूमोनिया कोणता आजार आहे? त्याची लक्षणे कोणती?

२१ दिवस गव्हाची चपाती नाही खाल्ली तर? शरीरात दिसतील आश्चर्यकारक बदल, तज्ज्ञ सांगतात..

Marathi Natak:'चिरंजीव परफेक्ट बिघडलाय'; चंद्रकांत कुलकर्णी लिखित नाटक लवकरच झळकणार मराठी रंगभूमीवर

SCROLL FOR NEXT