Karishma Tanna and Samir Kochhar Saam TV
मुंबई/पुणे

Karishma Tanna and Samir Kochhar: बॉलिवूडच्या दोन बड्या कलाकारांची फसवणूक; फ्लॅट विकण्याच्या बहाण्याने कोटींची लूट

Real Estate Scam: अभिनेत्री करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा आणि अभिनेता समीर कोचर यांना तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे.

Ruchika Jadhav

Bollywood News:

मनोरंजन विश्वातून फसवणुकीची एक मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेत्री करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा आणि अभिनेता समीर कोचर यांना तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. मुंबईतील (Mumbai) घर खरेदीवरून त्यांची फसवणूक झालीये. आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट फर्मच्या मालकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, प्रनीत प्रेम नाथ आणि त्यांच्या पत्नी अमिषा अशी आरोपींची नावे आहेत. या दोघांनी करिष्मा आणि समीर यांच्याकडून फ्लॅट (Home) विकण्याच्या नावाखाली १.०३ कोटी रुपये घेतले, असा आरोप करण्यात आला आहे. साल २०२२ मध्ये आरोपी व्यक्तीने अभिनेत्री करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा आणि अभिनेता समीर कोचर यांच्याकडे पैशांची मागणी केली होती.

मला पैशांची फार गरज आहे. त्यामुळे मी माझे दोन फ्लॅट विकतोय असं आरोपीने सांगितलं होतं. पुढे ठरल्याप्रमाणे करार करण्यात आला. आरोपीने करिष्मा आणि समीर या दोघांकडूनही अॅडवान्स रक्कम घेतली. ही रक्कम घेतल्यावर त्याची कागदपत्रेही तयार करण्यात आली. मात्र प्रत्यक्षात आरोपीने फ्लॅट दुसऱ्याच व्यक्तीला विकल्याचा आरोप कलाकारांनी केला आहे.

आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच अभिनेत्री करिष्मा तन्नाचा पती वरूण बंगेरा आणि अभिनेता समीर कोचर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी पती-पत्नीविरुद्ध भादंवि कलम ४०९, ४२० अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिग बॉस मराठी फेमच्या विरोधात पुण्यात गुन्हा दाखल; डॉक्टरांना घरात घुसून मारहाण अन्...; नेमकं प्रकरण काय?

620 पैकी 150 अधिकारी अजूनही मंत्र्यांच्या दालनात; 30 अधिकाऱ्यांचा शिंदेंचं कार्यालय सोडण्यास नकार?

AI च्या गैरवापरानं 100 कोटी मृत्यू; बिल गेट्स यांचा खळबळजनक दावा

Mulund land case : मोठी बातमी! मुलुंड जमीन गैरव्यवहारप्रकरणी महसूलमंत्र्यांच्या आदेशानंतर गुन्हा दाखल

पप्पा आत्महत्या करतील म्हणून मी त्यांच्या मागे जातो; धाराशिवच्या शेतकरी पुत्राची व्यथा ऐकून महाराष्ट्र हादरला

SCROLL FOR NEXT