kandivali police station, Gujarat, Social Media saam tv
मुंबई/पुणे

Kandivali : तिच्यात जीव गुंतला... दुस-याशी लग्न केल्याने Ex Boyfriend ने मॉडेलला केलं बदनाम, गुजरातमधून अटक

शिवाय सतत फोन करून तो तिला भेटण्यासाठी आग्रह करत असे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

- संजय गडदे

Kandivali Crime News : समाज माध्यमातून (social media) गुजराती अभिनेत्रीची बदनामी करणाऱ्या तिच्या माजी प्रियकरास मुंबईच्या कांदिवली पोलिसांनी (Kandivali Police) अटक केली आहे. मयांक कारिया (mayank kariya) असे अटक (arrests) केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला गुजरात (Gujarat) गीर सोमनाथ तालाल येथून अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री कांदिवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी असून अभिनेत्री आणि संशयित आरोपी हे एकमेकांच्या परिचित आहेत. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. मात्र फिर्यादी अभिनेत्रीने दुसऱ्या तरुणाबरोबर लग्न केल्याच्या रागातून माजी प्रियकराने तिचा बोगस आयडी तयार करून तिची समाज माध्यमातून बदनामी केली. शिवाय सतत फोन करून तो तिला भेटण्यासाठी आग्रह करत असे. (Maharashtra News)

मात्र फिर्यादीने आपले पूर्वाश्रमीचे जीवन विसरून नव्याने संसार करण्यास सुरुवात केली होती. अशातच प्रियकराने तिचे फोटो वापरून सोबत पती आणि मुलाचा मोबाईल नंबर देऊन अवैध संबंधाबाबतचा अपप्रचार केला. शिवाय अश्लील फोन तिच्या पतीच्या मोबाईलवर येऊ लागल्यामुळे फिर्यादी अभिनेत्रीने याविषयी कांदिवली पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

अभिनेत्रीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर संशयित मयांक कारिया यास गुजरात गीर सोमनाथ येथून पाेलिसांनी अटक केली. मयांक कारिया यास न्यायालयाने त्याला न्यायालयीन काेठडी सुनावली (judicial custody) आहे अशी माहिती पीआय सदाशिव सावंत यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhurandhar 2 Box Office: बॉक्स ऑफिसवर रणवीर सिंहचा जलवा; 'धुरंधर २' ची १३ दिवसात १५०० कल्बमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: अशोक खरातच्या मुलाची काल रात्री चौकशी

Crime News: घरात पतीचा मृतदेह दिसताच पत्नीनं १७ मजल्यावरून मारली उडी; इंजिनिअर जोडप्याच्या मृत्यूनं परिसरात खळबळ

New Labour Law: नवीन कायदा लागू; तुमचा पगार कमी होणार की वाढणार? लेबर कोडमध्ये नेमकं काय?

Mumbai Pune Tourist Spots: मुंबई-पुण्याजवळ वसलेल्या स्वर्गाहून सुंदर 'या' बेस्ट वीकेंड डेस्टिनेशनला द्या भेट

SCROLL FOR NEXT